कृषी महाविद्यालय परिसर पर्यावरणप्रेमींसाठी आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:29+5:302021-08-20T04:39:29+5:30

अटल आनंद घनवनचा वर्धापन दिन साजरा अंबाजोगाई : कृषी महाविद्यालयाचा परिसर साहित्यिक, कलाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला ...

Agricultural College Campus Attractions for Environmentalists | कृषी महाविद्यालय परिसर पर्यावरणप्रेमींसाठी आकर्षण

कृषी महाविद्यालय परिसर पर्यावरणप्रेमींसाठी आकर्षण

Next

अटल आनंद घनवनचा वर्धापन दिन साजरा

अंबाजोगाई : कृषी महाविद्यालयाचा परिसर साहित्यिक, कलाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तींसाठी हा परिसर ऊर्जेचा स्रोत बनत चालला आहे, असे गौरवोद्गार परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी काढले.

येथील कृषी महाविद्यालय, अंबेजोगाई येथे ‘मियावाकी’ या जपानी तंत्रज्ञानावर आधारित ‘अटल आनंद घनवन’ या वृक्ष लागवड प्रकल्पाचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. तर व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, माजी कार्यकारी परिषद सदस्य राहुल सोनवणे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाजवादक पं. उद्धवराव आपेगावकर, कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. बाबासाहेब गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले की, अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या कार्याव्यतिरिक्त महाविद्यालयाने प्रक्षेत्र व परिसर अत्यंत रमणीय आणि नेत्रसुखद असा बनवला आहे. महाविद्यालयाचा परिसर साहित्यिक, कलाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तींसाठी हा परिसर ऊर्जेचा स्रोत बनत चालला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षारोपण करून, शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लिली, मोगरा, गुलाब, निशिगंध इत्यादी फुलांनी विकसित केलेले उद्यान, ‘आनंद अटल घनवन’, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह व परिसरात लागवड केलेल्या १०० विविध प्रजातींच्या १५००० विविध वृक्षांची, त्यात प्रामुख्याने आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, कडुनिंब, उंबर, गुलमोहर, चिंच इत्यादी वृक्षांची मान्यवरांनी पाहणी केली. सदरील संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त, तणमुक्त व कचरामुक्त व सुंदर झालेला पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. संचालन डॉ. सुहास जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रताप नाळवंडीकर यांनी मानले.

190821\dsc_3873_1.jpg

कुलगुरू च्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

Web Title: Agricultural College Campus Attractions for Environmentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.