महिलांसाठी शेतीशाळा; प्रयोगाचे दिले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:13+5:302021-09-18T04:37:13+5:30
कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाच्या माध्यमातून आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी ...
कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाच्या माध्यमातून आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे, प्रकल्प सहाय्यक प्रताप मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कोदरी येथे घरच्या घरी गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती तंत्रज्ञान विषयावर शेतीशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी बुरशीजन्य रोगग्रस्त झाडांची निरीक्षणे दाखवली. शेंगांमधील हिरव्या व सुरकुत्या पडलेले बियाणे चांगल्या सोयाबीनमध्ये मिसळल्यामुळे भाव कमी मिळेल, याकरिता सोयाबीन काढणी करताना योग्य झाडांची निवड करणे, इतर जातीचे वाण अलग करणे, दोन जातींचे ढीग वेगवेगळे करणे, मळणी करताना घ्यायची काळजी, बियाणे साठवून ठेवण्याची शास्त्रोक्त पद्धत, अतिवृष्टीमुळे सोयाबीनला करे फुटू नयेत यासाठी शेतामध्ये चर काढून पाण्याचा निचरा करणे, शेतामध्ये हवा खेळती ठेवणे, तसेच महिला बचत गटासाठी पोकरा प्रकल्पांतर्गत कृषी प्रक्रिया उद्योगांची माहिती देऊन प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रशिक्षक यशश्री मुळे यांनी तूर शेंडे खुडण्याचे झालेले फायदे यावेळी पटवून दिले. शेतीशाळेला मीरा हजारे, अश्विनी कदम, सविता सुरवसे, आरती कदम, देवकन्या ढाणे, पूजा सुरवसे, रुक्मिणी पासाये, वैशाली सुरवसे, आशा जाधव, भगीरथी भगत, राधा घोगरे, उषा सुरवसे आदी महिला शेतकरी उपस्थित होत्या.
170921\17_2_bed_24_17092021_14.jpg
कोदरी येथे शेतकरी महिलांना सोयाबीन विषयी माहिती देताना शिवप्रसाद येळकर