अहो आश्चर्यम... एक नव्हे तब्बल आठपोळ्याचे मोहोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:07+5:302021-02-09T04:36:07+5:30
नितीन कांबळे कडा (जि.बीड) : आजवर एक पोळी असलेले मोहळ झाडावर, व इतर ठिकाणी आपण पाहिले असेल. आष्टी तालुक्यातील ...
नितीन कांबळे
कडा (जि.बीड) : आजवर एक पोळी असलेले मोहळ झाडावर, व इतर ठिकाणी आपण पाहिले असेल. आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव सर्जेराव घुले याच्या कांद्याच्या शेतात असलेल्या मातीच्या माठात एक नव्हे तर तब्बल आठ पोळ्या असलेले मोहळ आढळून आले आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव सर्जेराव घुले याचे गावापासून जवळच शेत आहे. शेतात जनावरं व शेळ्यासाठी घास केला आहे. कांद्याच्या शेतात एक मातीचा माठ ठेवलेला होता. पण जेव्हा हा माठ उचलून फेकायची वेळ आली, तेव्हा या मातीच्या माठात आजवर कधीच दिसले नाही कि कुठे नजरेसही पडले नाही, असे आठ पोळ्याचे मोहळ आढळून आल्याने आश्चर्यचा विषय बनला आहे. तो माठ त्यांनी उचलून तसाच गावात आणला. माझ्या आजवरच्या आयुष्यात असे मोहळ कधीच पाहिले नसल्याचे येथील उपसरपंच विजय डुकरे यांनी लोकमतला सांगितले.
आठ पोळे अन साडेतीन किलो मधाच्या मोहाळाने आश्चर्य वाटले.
लाॅकडाऊन काळात शेतात आम्ही पाणी पिण्यासाठी माठ आणून ठेवला. नंतर तिकडे दुर्लक्ष झाले. पण आता कांदे काढताना तो माठ पाहिला तर मोहळ होते. धूर करून उठवले असता आठ पोळ्याचे मोहळ साडेतीन किलो भरले हे पाहून आश्चर्य वाटले असल्याचे शेतकरी महादेव सर्जेराव घुले यांनी लोकमतला सांगितले.