आहेर लिंबगावचा पाणी फाउंडेशनतर्फे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:04+5:302021-08-15T04:34:04+5:30

बीड : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा २०२१-२२ अंतर्गत समृद्धीच्या वाटेवरील बीड तालुक्यातील आहेर लिंबगाव ग्रामपंचायतचा ...

Aher honored by Limbgaon Water Foundation | आहेर लिंबगावचा पाणी फाउंडेशनतर्फे सन्मान

आहेर लिंबगावचा पाणी फाउंडेशनतर्फे सन्मान

googlenewsNext

बीड : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा २०२१-२२ अंतर्गत समृद्धीच्या वाटेवरील बीड तालुक्यातील आहेर लिंबगाव ग्रामपंचायतचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व वृक्ष लागवडीसाठी एक किलो सीताफळ बिया देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आहेर लिंबगावचे सरपंच शेख रईस, ग्रामसेविका अयोध्या शिंदे, जलमित्र शेतकरी गणेश धुमाळ, मिलिंद निकाळजे आदींसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.

बीड तालुक्यातील २० गावांचा सन्मान जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आला. यावेळी नुकतीच बदली झालेले जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नवरे, उपविभागीय अधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार शिरीष वमणे, तालुका कृषी अधिकारी बी. आर. गंडे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे आदी उपस्थित होते.

पाणीपातळी वाढली

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गावांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन श्रमदान केले. बीड तालुक्यातील आहेर लिंबगाव येथील ग्रामस्थांच्या श्रमदानातून नाला खोलीकरण व बांध बंदिस्तीची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ग्रामस्थांच्या मेहनतीला आता यश आले आहे. गावातील विहिरी व बोअरची पाणी पातळी वाढली असून गाव दुष्काळमुक्त होण्यास मदत झाली आहे. हे गाव आणखी समृद्ध व्हावे म्हणून पाणी फाउंडेशनच्या वतीने गावाचा सन्मान करून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

130821\451013_2_bed_11_13082021_14.jpeg

आहेर लिंबगाव

Web Title: Aher honored by Limbgaon Water Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.