एड्स घातकच ; बीड जिल्ह्यात ३७७ गरोदर माता, ९६८४ नागरिकांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:07 PM2020-12-05T12:07:54+5:302020-12-05T12:10:07+5:30

जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात २००६ व बीडमध्ये २००९ मध्ये एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सेंटर सुरू करण्यात आले.

AIDS is deadly; In Beed district, 377 pregnant mothers and 9684 citizens were infected | एड्स घातकच ; बीड जिल्ह्यात ३७७ गरोदर माता, ९६८४ नागरिकांना लागण

एड्स घातकच ; बीड जिल्ह्यात ३७७ गरोदर माता, ९६८४ नागरिकांना लागण

Next
ठळक मुद्दे२००९-१० साली जिल्ह्यातील बाधितांचा टक्का ५.५ एवढा होता. तो आता ०.४२ वर आला आहे. गतवर्षी तोच ०.३८ एवढा होता.

बीड : जिल्ह्यात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यात अपयश आल्याचे दिसत आहे. मागील दहा वर्षांचा आढावा घेतला असता तब्बल ३७७ गरोदर माता आणि ९ हजार ६८४ सामान्य नागरिकांना याची लागण झाल्याचे समाेर आले आहे. ५.५ वरून टक्का ०.४२ वर आला असला तरी त्याने अद्यापही शून्य गाठलेला नाही. तो कमी करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध विभागाकडून उपचार अन् समुपदेशन केले जात आहे. 

जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात २००६ व बीडमध्ये २००९ मध्ये एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सेंटर सुरू करण्यात आले. येथे रुग्णांची तपासणी करून उपचार केले जातात. रुग्ण बाधित आढळताच त्याला ‘डापकू’ विभागाकडे पाठविले जाते. येथे तिचे सुरुवातीला समुपदेशन करून आधार दिला जातो. त्यानंतर तात्काळ उपचार सुरू केले जातात. तसेच वारंवार पाठपुरावा करून उपचारही केले जातात. बाधित आढळल्यापासून १८ महिन्यापर्यंत चारवेळा तपासणी केली जाते. शेवटची तपासणी निगेटिव्ह आल्यास त्याला सोडूून देण्यात येते.

यावर्षी टक्का वाढला
२००९-१० साली जिल्ह्यातील बाधितांचा टक्का ५.५ एवढा होता. तो आता ०.४२ वर आला आहे. गतवर्षी तोच ०.३८ एवढा होता. तसेच गरोदर मातांचाही टक्का सध्या ०.०२ एवढा आहे. गतवर्षी ०.०३ तर २०१८ साली तोच ०.०२ एवढा होता. मागील दहा वर्षांत ९६८४ लोकांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे उघड झालेले आहे. पूर्वीपेक्षा टक्का कमी होत आहे. रुग्ण बाधित आढळताच वारंवार पाठपुरावा करून औषधोपचार केले जातात.     
    - साधना गंगावणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बीड

एआरटी सेंटरनुसार रुग्णांचे वर्गीकरण
एआरटी सेंटरचे नाव    एकूण     इतरत्र    सध्याची    मृत्यू
    नोंदणी    पाठवले    नोंदणी    संख्या
बीड (सप्टेंबर २०१२ पासून)    ५३०४    ४७९    ४८२५    १००२
अंबाजोगाई (सप्टेंबर २००६ पासून)    ११९०६    ४५८०    ७३२६    २५३१

वर्षनिहाय आकडेवारी
कालावधी    तपासणी    बाधित
२००९-२०१०    ३२९६५    १८१४
२०१०-२०११    ३१५३५    १४५१
२०११-२०१२    ३५३४९    ११४५
२०१२-२०१३    ४३९९७    ९६९
२०१३-२०१४    ४६४६१    ९०३
२०१४-२०१५    ४८१३४    ७४८
२०१५-२०१६    ७१५१८    ६८३
२०१६-२०१७    ६२४७१    ५६९
२०१७-२०१८    ६७६३१    ४८२
२०१८-२०१९    ७४१५९    ३८३
२०१९-२०२०    १०७४१२    ४१३
२०२०- ऑक्टोबर २०२०    २९३९१    १२४

Web Title: AIDS is deadly; In Beed district, 377 pregnant mothers and 9684 citizens were infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.