कारमधील एअरबॅगनं वाचवला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 04:35 PM2017-05-15T16:35:19+5:302017-05-15T16:35:19+5:30

अंबाजोगाई कळंब रस्त्यावर सोमवारी दुपारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील पोलीस उपनिरीक्षकासहीत कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहेत.

Airbagne saved the car | कारमधील एअरबॅगनं वाचवला जीव

कारमधील एअरबॅगनं वाचवला जीव

Next

ऑनलाइन लोकमत

बीड, दि. 15 - अंबाजोगाई  कळंब रस्त्यावर सोमवारी दुपारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील पोलीस उपनिरीक्षकासहीत कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहेत.
 
कराड येथे नियुक्त असलेले पोलीस उपनिरीक्षक राठोड हे सुटीनिमित्त कुटुंबासहीत सहलीवर निघाले होते. अंबाजोगाई - कळंब रस्त्यावरील बोरी सावरगाव जवळ आले असता त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्ट्ररला पाठीमागून जोरदार धडक दिली. या कारमधील राठोड कुटुंबीयातील तीन सदस्य किरकोळ जखमी झाले. धडक होताच क्षणार्धात एअर बॅग उघडल्याने कुणालाही गंभीर इजा झाली नाही. 
 
दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ताबडतोब १०८ रूग्ण वाहिकेला फोन केल्यावर रूग्णवाहिकेतील डॉ. सचिन कस्तुरे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत जखमींवर प्राथमिक उपचार केले.

Web Title: Airbagne saved the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.