एआयएसएफचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:13 AM2018-01-16T00:13:16+5:302018-01-16T00:14:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, शिपाई, लिपीक सह सर्वच क्षेत्रातील रिक्त जागा जाहीर करुन त्या ...

AISF's Beed District Collectorate's Aakash Morcha | एआयएसएफचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

एआयएसएफचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘रिक्त जागा जाहीर करून भरा’

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, शिपाई, लिपीक सह सर्वच क्षेत्रातील रिक्त जागा जाहीर करुन त्या त्वरीत भराव्यात, या मागणीसाठी आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, साठे चौक, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. एआयएसएफच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राज्याध्यक्ष पंकज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रामहरी मोरे, अंगद ढाकणे, दत्ता भोसले, संदीप केदार, सावता मुळे, बालाजी जोगदंड, रोहन मगर, आशिष चौरे, दत्तात्रय खंदारे, रघुवीर कुरे, महेंद्र मोरे, संदीप नागरगोजे, संकेत चंदनशीव, विनय घाडगे, किरण वडते, अशोक पवळ, विजय राठोड, योगेश सरवदे, बाबासाहेब कदम, गणेश सानप, आण्णासाहेब मतकर, सुनील चव्हाण, ऋषीकेश पुरी, अशोक केदार यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

या आहेत मागण्या...
राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा जाहीर करुन तात्काळ भराव्यात, शासनाने घेतलेला ३० टक्के नौकर कपातीचा निर्णय रद्द करावा, १३१४ शाळा बंदीचा निर्णय रद्द करावा, शाळा कंपनीकरण विधेयक बंद करावे, परीक्षा शुल्क केंद्र शासनाप्रमाणे स्वीकारावे, नौकरी देईपर्यंत बेरोजगारांना किमान पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता द्यावा, यासारख्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Web Title: AISF's Beed District Collectorate's Aakash Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.