पिकविम्यासाठी धारूरमध्ये सर्व पक्षीय रस्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:14 PM2019-08-02T16:14:18+5:302019-08-02T16:18:35+5:30

आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती.

All-party Rastaroco agitation in Dharur for crop insurance | पिकविम्यासाठी धारूरमध्ये सर्व पक्षीय रस्तारोको आंदोलन

पिकविम्यासाठी धारूरमध्ये सर्व पक्षीय रस्तारोको आंदोलन

Next

धारूर (बीड ) : वाढीव विमा असे कारण दाखवत सोयाबीनसाठी विमा नाकारण्यात आला. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी, विविध पक्ष, संघटना, सेवाभावी व सामाजिक संघटनेच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. 

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप 2018 चा पिकविमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.कडे भरला होता. बऱ्याच संघर्षानंतर कंपनीने  विमा देण्याचे मान्य केले. मात्र, सोयाबीनच्या पिक विमा हा मान्य केल्यानंतर प्रकाशित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना 'वाढीव विमा' असे कारण दाखवत पिक विमा नाकारला गेला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी निवेदन नायब तहसीलदार सुहास हजारे यांना दिले. तसेच कंपनी व प्रशासनाने दिनांक 14 ऑगस्टपर्यंत पिकविमा लागू न केल्यास दिनांक 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

आंदोलनात माजी मंत्री प्रकाश सोळंके, शिवसेनेचे नारायण कुरुंद, दामोदर शिनगारे, विठ्ठल दादा शिनगारे, माधव निर्मळ, ईश्वर मुंडे, उमाकांत सोळुंके, विजयकुमार गायकवाड, सुरेश फावडे, विनायक शिनगारे, अनिल महाजन, मोहन भोसले,सुधीर शिनगारे, नितिन शिनगारे किशोर थोरात, यशवंत गायके, अतुल शिनगारे, अंगद डापकर, रामेश्वर खामकर सिद्धेश्वर रणदिव, ईश्वर खामकर,  परमेश्वर शिनगारे,अतुल शिनगारे, प्रदीप शिनगारे, संजय फावडे, शेषराव गडदे , अनिल सोळुंके, सूर्यकांत जगताप, सादिक इनामदार, बालाजी चव्हाण, आनंद भावठणकर, सांभाजी तिबोले  सह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, नगर परिषद सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

Web Title: All-party Rastaroco agitation in Dharur for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.