तिन्ही मुंडे भगिनी वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुक रिंगणात; धनंजय मुंडेंनी केला नाही अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 08:08 PM2023-05-16T20:08:25+5:302023-05-16T20:08:57+5:30
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले
- संजय खाकरे
परळी: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पाठोपाठ आज त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे व त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी ही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेच्या निवडणुकीसाठी 16 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. निवडणुकीसाठी आज खासदार प्रीतम मुंडे, ऍड यशश्री मुंडे, प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे यांनी अर्ज दाखल केले. तसेच आमदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड, बीड जिल्हा परिषदेचे माजी गट नेते अजय मुंडे व इतरांचे अर्ज दाखल झाले. मात्र, आ. धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
१ जून अर्ज मागे घेण्याची तारीख
दरम्यान, काल 15 मे रोजी पंकजा मुंडे, फुलचंद कराड यांच्यासह 15 जणांचे अर्ज दाखल झाले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी निवडणूक होते आहे. त्यासाठी एकूण 50 अर्ज प्राप्त झाल्याची जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था तथा माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी दिली. 18 मे ते 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे खरेचित्र एक जून रोजी स्पष्ट होणार आहे.
आज 35 जणांचे अर्ज दाखल
प्रज्ञा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, यशश्री गोपीनाथराव मुंडे, सुमन फुलचंद कराड, अजय मुंडे, वाल्मीक कराड, विनायक गडदे, अंगद मुंडे, सुरेश माने, विजय माळी, बंकटराव कांदे ,रेशीम कावळे,पांडुरंग फड ,बळीराम गडदे, सतीश मुंडे ,शिवाजी मोरे ,केशव माळी, प्रभाकर माने ,ज्ञानोबा मुंडे, हरिभाऊ गुट्टे सुधाकर सिनगारे ,संजीवनी गुट्टे, हरिभाऊ देशमुख, सचिन दरक, ,नारायण पारवे, मंचक घोबाळे ,सत्यभामा आघाव, सुशीला मुसळे, ज्ञानेश्वर शिंदे ,श्रीराम मुंडे कुंडलिक मुंडे ,वसंत राठोड, चंद्रकेतू कराड , विनायक गुट्टे, विठ्ठल नागरगोजे
15 मे रोजीचे उमेदवारी अर्ज
पंकजा मुंडे, फुलचंद कराड , सूर्यकांत रामकृष्ण मुंडे, बाबासाहेब शंकरराव शिंदे ,रामकिशन घाडगे ,गोदाबाई गीते ,विनायक गडदे ,राजेश गीते ,शिवाजी गुट्टे, सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे या 11 जणांनी 15 मे रोजी 15 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
निवडणुक कार्यक्रम:
10-05-2023- ते 16-05-202: नामनिर्देशन पञ भरणे
दि 17-05-2023 : छाननी
दि 18-05-2023 ते दि 01-06-2023: माघार
दि02-06-2023: चिन्ह वाटप
दि 11-06-2023: मतदान
दि 12-06-2023: मतमोजणी