नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच सुरळीत चालू, 648 मेगावॉट वीजेची झाली निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 07:16 PM2021-04-07T19:16:59+5:302021-04-07T19:17:17+5:30
आर्थिक वर्ष 2020-21 या मध्ये राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संचामध्ये टॉपच्या चार संचामध्ये परळीच्या संच क्रमांक आठचा प्लांट लोड फैक्टरमध्ये समावेश झाला आहे.
- संजय खाकरे
परळी : मराठवाड्याचे भूषण असलेल्या येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॉट क्षमतेचे तीन ही संच सुरळीत चालू आहेत. या संचातून बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास 648 मेगावॉट एवढ्या विजेचे उत्पादन चालू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी, कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर, कामगार काळजी घेत आपली सेवा बजावित आहेत.
विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2020-21 या मध्ये राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संचामध्ये टॉपच्या चार संचामध्ये परळीच्या संच क्रमांक आठचा प्लांट लोड फैक्टरमध्ये समावेश झाल्याबद्दल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी येथील संच क्रमांक आठच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.
परळी तालुक्यातील दाऊतपुर, दादाहारी वडगाव शिवारात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. यामध्ये 250 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक 6 ,7 व 8 तीन संच असून या तीन संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे. हे तीन ही संच सुरळीत चालू असून या संचात बुधवारी 648 मेगावॉट एवढी वीज उत्पादित चालू होती. परळी येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच पूर्ण क्षमतेने चालू आहेत.
कोराना नियमांचे प्रत्येक कर्मचारी पालन करत आहे. कसली ही कर्मचारी कपात नाही
- मोहन आव्हाड ,मुख्य अभियंता