धारूर तालुक्यात सर्वच गावे बाधित, कोरोनाने घेतले ३० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:35 AM2021-04-23T04:35:48+5:302021-04-23T04:35:48+5:30

धारूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढत असून गतवर्षीपासून आतापर्यंत कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ...

All villages in Dharur taluka affected, 30 killed in Corona | धारूर तालुक्यात सर्वच गावे बाधित, कोरोनाने घेतले ३० बळी

धारूर तालुक्यात सर्वच गावे बाधित, कोरोनाने घेतले ३० बळी

googlenewsNext

धारूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढत असून गतवर्षीपासून आतापर्यंत कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ७२ गावे कोरोनाबाधित असून एकही गाव कोरोनामुक्त नाही. ३२२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. धारूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन ऑक्सिजन बेड आहेत. मात्र, रुग्ण गंभीर असला तर त्याला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरसाठी आंबाजोगाई किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागते.

धारूर तालुका

३ कोविड केअर सेंटर

२६० खाटा मंजूर

३२२ जणांवर सध्या उपचार

१४६६ आतापर्यंतचे पॉझिटिव्ह

११५० कोरोनामुक्त

३० जणांचा मृत्यू

७२ गावे कोरोनाबाधित

०० कोरोनामुक्त गाव

३० आवरगावात सर्वाधिक रुग्ण

अपुऱ्या सुविधा

चाचणीसाठी धारूर, भोगलवाडी, मोहखेड, रुईधारूर येथे हे केंद्रे आहेत. धारूर येथील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये गंभीर रूग्णासाठी दोन ऑक्सिजन बेडची सोय आहे. मात्र, व्हेंटिलेटर तालुक्यात उपलब्ध नाही.

डॉक्टरांवर ताण वाढला

कोविड केअर सेंटरवर काम करण्यास दुसरे कर्मचारी मिळत आहेत. मात्र, डॉक्टर्स मिळत नाहीत. त्यामुळे उपलब्ध डाॅक्टरांवर कामाचा ताण येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व लसीकरण करावे - डाॅ. स्वाती डिसले, तालुका आरोग्य आधिकारी

===Photopath===

220421\img_20210410_180709_14.jpg

Web Title: All villages in Dharur taluka affected, 30 killed in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.