कथित ऑडियो क्लिप व्हायरल, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले

By सोमनाथ खताळ | Published: June 27, 2024 06:41 PM2024-06-27T18:41:35+5:302024-06-27T18:42:53+5:30

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतू कार्यालय फोडणारे कोण होते? हे अद्याप समाेर आलेले नाही.

Alleged audio clip goes viral, Beed Shiv Sena district chief Kundlik Khande's office broken | कथित ऑडियो क्लिप व्हायरल, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले

कथित ऑडियो क्लिप व्हायरल, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले

बीड : पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याबरोबरच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही एकेरी भाषेत बोललेली कथीत ऑडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. या क्लीपमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते प्रा.शिवराज बांगर यांच्यातील संवाद आहे. 

या कथीत क्लीप व्हायरल होताच गुरूवारी सायंकाळच्या सुमारास खांडे यांचे जालना रोडवरील संपर्क कार्यालय जमावाने फोडले. काचा व इतर तोडफोड केल्याने माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही माहिती समजताच बीड शहर  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतू कार्यालय फोडणारे कोण होते? हे अद्याप समाेर आलेले नाही.

Web Title: Alleged audio clip goes viral, Beed Shiv Sena district chief Kundlik Khande's office broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.