पर्यायी पूल वाहून गेला, गेवराई-माजलगाव रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:22 AM2021-06-29T04:22:58+5:302021-06-29T04:22:58+5:30
बागपिंपळगाव ते सावरगाव या रस्त्याचे काम सुरू आहे.जवळपास १५० कोटी रुपये निधी तरतूद असलेल्या या रस्त्यावर नदी-नाल्यावरील पुलांचेही ...
बागपिंपळगाव ते सावरगाव या रस्त्याचे काम सुरू आहे.जवळपास १५० कोटी रुपये निधी तरतूद असलेल्या या रस्त्यावर नदी-नाल्यावरील पुलांचेही बांधकाम सुरू आहे. राजापूर येथील कापशी नाल्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने, या नाल्यावर नळ्या टाकून पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती. या पुलावरून वाहतूक सुरू होती.
पण रविवारी तालुक्यात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे राजापूरजवळील कापशी नदीला पूर आला होता. या पुरात रस्त्यावर बनविलेला पर्यायी पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंदच होती. महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. पण दिवसभर पर्यायी पुलाचे काम चालू असल्याने वाहतूक बंदच होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊन वाहतूकदारांचा गोंधळ उडाला होता.
अनेक ठिकाणी पर्यायी पूल
या मार्गावरील नाल्यावर जवळपास ८ ते १० पूल आहेत. यातील काही पूल पूर्ण झाले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पुलांचे काम अर्धवट आहे. त्यामुळे तेथेही पर्यायी पूल वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत. पर्यायी पूल मजबूत करावे, अशी मागणी होत आहे.
नाल्यावरील पुलाचे काम चालू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. पण पाऊस मोठा असल्याने मोठ्या प्रमाणात पूर होता. त्यामुळे नळ्यावरील माती वाहून गेली. काम वेगाने सुरू आहे. पाऊस नाही आला तर काम वेळेत होईल, असे कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक दीपक जैन यांनी सांगितले.
===Photopath===
280621\28_2_bed_11_28062021_14.jpeg~280621\28_2_bed_10_28062021_14.jpeg
===Caption===
राजापूर~राजापूर