पक्ष बदलला असला तरी मी नियत अजून बदललेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:06 AM2019-10-19T00:06:55+5:302019-10-19T00:07:35+5:30

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

Although the party has changed, I have not changed it yet | पक्ष बदलला असला तरी मी नियत अजून बदललेली नाही

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजून बदललेली नाही

googlenewsNext
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात

बीड : पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
खडकपुरा व वतारवेस येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, भाजपाचे भगिरथ बियाणी, सलिम जहाँगीर, सुशील पिंगळे, सागर बहीर, विकास जोगदंड, रामिसंग राख, दिलीप भोसले, शुभम कांतांगळे, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, निवडणुकीत अफवा पसरविल्या जातात. भावनिक आणि जातीयवादी अफवापासून मतदारांनी दूर रहावे. शिवसेना हा जातीयवादी नसून या पक्षात सर्वांनाच सामावून घेतले जाते. सत्तेत असो वा नसो अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच राहिला आहे. सर्वानाच मदत करायची माझी भावना या समाजाने अनुभवली आहे. मी कधीही जातीवाद किंवा भाउक विधाने करु न कुणाचे मन दुखावले नाही, असे जयदत्तअण्णा म्हणाले.
माजी खासदार केशरकाकू यांच्यापासून सर्वधर्मसमभावाचे तत्व अंगिकारले आहे. बीड जिल्ह्यात सामाजिक ध्रुवीकरण करून विकासाच्या मुद्यावरच आपण निवडणुका लढल्या आहेत. आमचा चांगुलपणा ही आमची ताकद आहे. म्हणूनच आम्ही कुठेही असलो तरी मतदार आमच्यासोबतच असतो, हे सत्य आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.
यावेळी अनिल जगताप यांनीही मार्गदर्शन करताना जयदत्तअण्णांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांसह सर्वांनाच भेदाभेद न करता सहकार्य कसे केले हे सांगितले. अण्णांच्या विजयासाठी शिवसैनिक रात्रदिवस मेहनत घेत असल्याचे जगताप म्हणाले.
विजयासाठी वज्रमुठ आवळा - नितीन बानगुडे पाटील
चौसाळा : जयदत्त क्षीरसागर यांना विकासाची दुरदृष्टी आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी, विकास योजना आणण्यासाठी उमेदवार हा अभ्यासू असावा लागतो.
जयदत्तअण्णांना निवडून आणा, त्यांचे मंत्रीपद पक्के आहे, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी चौसाळा येथे मतदारांना आवाहन केले.

Web Title: Although the party has changed, I have not changed it yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.