उद्घाटनाला वर्ष उलटले तरी कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:30 AM2021-02-14T04:30:53+5:302021-02-14T04:30:53+5:30

कडा : उद्घाटनाला वर्ष उलटले तरी जागेच्या वादामुळे कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने महिला, मुली व प्रवाशांची मोठ्या ...

Although the year was reversed for the inauguration, the work of Kada bus stand did not take a moment | उद्घाटनाला वर्ष उलटले तरी कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागेना

उद्घाटनाला वर्ष उलटले तरी कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागेना

Next

कडा : उद्घाटनाला वर्ष उलटले तरी जागेच्या वादामुळे कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने महिला, मुली व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार व दिवसभरात २००हून अधिक बसेसची ये-जा असलेल्या कडा बसस्थानकाला उतरती कळा आली होती आणि सोयीसुविधा नसल्याने नवीन बसस्थानक व्हावे, अशी जनतेची मागणी होती. हा प्रश्न मार्गी लागला, मंजुरी मिळाली, उद्घाटनही झाले, एक कोटी चाळीस लाख रुपये खर्चाला कार्यारंभ आदेश मिळाला. जागेचे मार्कआउट केले. पण, नेमकी जागा ग्रामपंचायतीची की राज्य मार्ग परिवहन महामंडळाची, हा वाद मिटत नसल्याने वर्ष उलटून गेले तरी कामाला मुहूर्त अद्याप लागलेला नाही.

आष्टी तालुक्यातील कडा येथे बीड नगर राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानक आहे. अनेक वर्षांपासून बसस्थानक असल्याने आता ती जागा अपुरी पडत असून, सोयी-सुविधा मिळत नसल्याने जनतेच्या रेट्यामुळे सन २०१८मध्ये नवीन बसस्थानक मंजूर झाले. २०१९ला उद्घाटन झाले. पण, तेव्हापासून ग्रामपंचायत व एसटी महामंडळात जागा कोणाची, असा वाद सुरू झाला. ग्रामपंचायत व महामंडळ दोघेही आमचीच जागा असल्याचा दावा करत असल्याने ती जागा नेमकी कोणाची, हे अजूनही समजले नाही. त्यामुळे जवळपास दीड कोटी रुपये खर्चून शहरांच्या वैभवात भर घालणाऱ्या या नियोजित बसस्थानकाच्या कामाला आडकाठी निर्माण झाली आहे. सध्या या ठिकाणी कसलीच सोय नाही. प्रवाशांना उघड्यावरच नैसर्गिक विधीसाठी बसावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर कुचंबना होत आहे.

शहराच्या वैभवात भर पडत असेल तर लवकरात लवकर जागेचा वाद मिटवून बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

याबाबत आष्टी येथील आगारप्रमुख संतोष डोके यांना विचारणा केली असता कडा बसस्थानकाच्या जागेचा वाद सुरू असल्याने बसस्थानकाचे काम बंद असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जागेच्या वादाचा विषयच येत नाही. महामंडळाने त्यांना ठरवून दिलेल्या ६१ गुंठे जागेत बसस्थानकाचे काम सुरू करावे, असे कडा येथील ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे म्हणाले.

Web Title: Although the year was reversed for the inauguration, the work of Kada bus stand did not take a moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.