भूमिहीन गायरानधारकांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध - जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:07+5:302021-07-16T04:24:07+5:30

आष्टी तालुक्यातील कडा येथे विविध अडीअडचणींसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन ...

Always committed to give justice to landless landlords - District President Nathabhau Alhat | भूमिहीन गायरानधारकांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध - जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट

भूमिहीन गायरानधारकांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध - जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट

Next

आष्टी तालुक्यातील कडा येथे विविध अडीअडचणींसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व टायगर मूव्हमेंटचे शहराध्यक्ष प्रशांत भिंगरदिवे, काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे उपशहराध्यक्ष संतोष जगताप, नितीन कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की समाजात सध्या अन्याय, अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यासाठी आता यावर विचारमंथन करून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण शिकलोत, संघटित झालोत; पण खरा न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. त्याचबरोबर गायरानधारकांच्या नावे अतिक्रमित केलेली जमीन नावावर करण्यासाठी आणि हक्काचा सातबारा मिळावा यासाठी पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष रमेश साळवे याच्या माध्यमातून भटके, विमुक्त, अनुसूचित जाती, जमाती, भूमिहीन, लोकांना सोबत घेऊन लवकरच राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे नाथाभाऊ आल्हाट यांनी सांगितले.

यावेळी दिगंबर जाधव, दीपक गरुड, अशोक जाधव, किशोर घोडके, बबलू आखाडे, कमलेश जाधव, विशाल जाधव, नितीन वाघमारे, शाहू घोडके, बाळू घोडके, सागर घोडके, अशोक राजगुरू, विशाल राजगुरू, संतोष जाधव, अशोक खरात, आकाश कांबळे, नाना मनतोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक गरुड यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर घोडके यांनी आभार मानले.

Web Title: Always committed to give justice to landless landlords - District President Nathabhau Alhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.