कोविड सेंटरमध्ये आमरसाची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:32 AM2021-05-15T04:32:20+5:302021-05-15T04:32:20+5:30

शिरूर कासार : तालुक्यात कोरोनाची सौम्य लक्षण असलेल्या बाधित रुग्णांना येथील शासकीय निवासी शाळेमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले ...

Amarsa feast at the Covid Center | कोविड सेंटरमध्ये आमरसाची मेजवानी

कोविड सेंटरमध्ये आमरसाची मेजवानी

Next

शिरूर कासार : तालुक्यात कोरोनाची सौम्य लक्षण असलेल्या बाधित रुग्णांना येथील शासकीय निवासी शाळेमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाते. त्यांना औषधी उपचारासोबतच अल्पाहार, भोजन व्यवस्था केली जाते. जेवणाच्या मेनूत बदलही केला जातो. शुक्रवारी अक्षय तृतीयेचे औचित्य साधून येथील बाधित रुग्णांना आमरसाचे स्वादिष्ट भोजन दुपारी देण्यात आले. या सेंटरमध्ये जवळपास १२५ रुग्ण व त्यांची देखभाल करणाऱ्या डॉक्टरसह अन्य कर्मचारी मिळून दीडशे लोकांना दुपारच्या भोजनात आमरसाची मेजवानी चाखण्यास मिळाली.

अक्षय तृतीया एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते. यादिवशी प्रत्येक घरी दिवंगत वाडवडिलांचे स्मरण करून त्यांच्या प्रीत्यर्थ सोयऱ्यांना निमंत्रण देऊन मिष्टान्न भोजन दिले जाते. यानिमित्त घरातील सर्वच लोकांना त्याचा लाभ मिळत असतो.

कोरोनाने सर्वच परंपरा नित्य-नैमित्तिक कार्यक्रमांवर घाला घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची नियमावली तर माणूस माणसाजवळ येऊ देत नाही. नाते, गोते भेटीगाठी, सुख, दुःखात सहभाग या साऱ्या गोष्टी बंद झाल्यागत आहे. त्रासाची जाणीव होताच तपासणी आणि पाॅझिटिव्ह निघाला की त्याला दहा दिवस अलगीकरणात राहावे लागते. बाधित रुग्णांना सेंटरमध्ये ठेवल्यानंतर त्यांना सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न होत असला तरी घर सोडून राहताना होणाऱ्या वेदना असह्य असतात. त्याचा काहीसा विसर पडावा व रुग्णाला आराम मिळावा यासाठी योगा, प्राणायाम आदींबरोबरच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भजन, भारुडासारखे करमणूक कार्यक्रमदेखील केले जात आहेत. अक्षय तृतीया म्हणून येथील बाधित रुग्ण आपलेच आहेत, या भावनेतून त्यांना शुक्रवारी आमरसाचे भोजन देण्याची कल्पना सुचली आणि ती आपण पूर्ण केल्याने एक मनस्वी आनंद झाल्याची भावना भोजन व्यवस्था करणारे सुरेश खारोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवाय रुग्णांना सेवा देताना आपण कुठेही कमी पडू नये याची पुरेपूर काळजी घेत असल्याचेही सांगून जेवणात सतत बदल केला जात असल्याचेही सांगितले.

सेंटरमध्ये शुक्रवारी सर्वांनी आमरसाचा बेत चाखला असून व्यवस्थापक सुरेश खारोडे रुग्णांच्या नाश्ता, भोजनाबाबत कुठलीही तक्रार येऊ देत नसल्याचे नोडल ऑफिसर डॉ. सुहास खाडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी सांगितले.

===Photopath===

140521\vijaykumar gadekar_img-20210514-wa0037_14.jpg

Web Title: Amarsa feast at the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.