शेतकऱ्यांच्या हितासाठी अंबाजोगाई कारखाना चालवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:41+5:302021-09-05T04:37:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कारखान्याचा कारभार अतिशय काटकसरीने करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळातही कारखाना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कारखान्याचा कारभार अतिशय काटकसरीने करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळातही कारखाना चालवणार आहे, अशी माहिती अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
संचालक मंडळाने अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ साली घेण्याचे ठरविले. हंगाम सुरू करीत असताना आर्थिक अडचणी होत्या. परंतु हा कारखाना टिकावा, या उद्देशाने गेल्या वर्षीच्या हंगामात कारखाना चालू ठेवला. कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले. काम केलेल्या काळातील कामगारांचे पगारही केले. मागील वर्षी २०२०-२१ साली हा कारखाना चालू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव घेतला. परत सभासदांकडून ठेवी घेतल्या. व्यक्तिगत नावावर कर्ज ही काढले. कारखान्याच्या दुरूस्तीचे काम केले. नोव्हेंबर महिन्यात कारखाना सुरू झाला. अंदाजे हा कारखाना १०० दिवस चालला. परंतु , या १०० दिवसांमध्ये कारखान्याचे बॉयलरमध्ये सातत्याने बिघाड होऊन तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक बॉयलर पुन्हा बंद पडल्यामुळे कारखाना बंद झाला. आर्थिक नुकसान झाले. कारखान्याने १ लाख ७३ हजार मे.टन उसाचे गाळप केले. यातून १ लाख ३४ हजार क्विंटल साखर निघाली. ९ लाख लिटर स्पिरीट निघाले. याच्या विक्रीमधून जी रक्कम मिळाली त्यामधून ऊस बिलाच्या ७६ टक्के एवढी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली, असेही आडसकर यांनी सांगितले.
...
जमीन विकून शेतकऱ्यांचे पैसे दिले
उर्वरित कमी पडलेली रक्कम शासनाने थकहमी देऊन सुद्धा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिली नाही. त्यामुळे साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची राहिलेली २४ टक्के एवढी ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त व कारखान्यांकडे तगादा लावला. त्यामुळे साखर आयुक्तांनी कारखान्याची स्थावर मालमत्ता विकून उर्वरित शेतकऱ्यांची राहिलेली देणी देण्यात यावीत, असे आदेशित केले. साखर आयुक्त यांच्या आदेशानुसार कारखान्याच्या जमीन विक्रीतून जी मिळालेली रक्कम आहे. ती सर्व रक्कम शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग केली आहे, असेही रमेश आडसकर यांनी सांगितले.
....
030921\3730img-20210903-wa0066.jpg
रमेश आडसकर