हिंजवडी घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईत महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:05 AM2018-10-05T00:05:07+5:302018-10-05T00:06:01+5:30

कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की जय, वंदे मातरम्च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला होता.

Ambajogai Mahamarcha in protest of the incident of Hinjewadi | हिंजवडी घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईत महामोर्चा

हिंजवडी घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईत महामोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देशाळा, महाविद्यालयांचा सहभाग : अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीचा पुढाकार; पथनाट्यातून केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की जय, वंदे मातरम्च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला होता.
काळ्या फिती लावून, निषेधाच्या घोषणा देवून बॅनर, फलक घेवून शहरातील शाळा, महाविद्यालयातील एक हजारहून अधिक विद्यार्थिनी, युवती, युवक यांच्यासह नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक संजय गंभिरे, प्रा.अरूंधती पाटील, बालासाहेब शेप, संतोष काळे, अनंतराव घुले, विजय अंजाण, सचिन केंद्रे, वैजेनाथ देशमुख, प्रा.रमा पांडे, संध्या आरबाड आदींसह सामाजिक व राजकिय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते, मान्यवर सहभागी झाले. शिवाजी चौकात व उपविभागीय कार्यालयासमोर पथनाट्य सादर करून निदर्शने करण्यात आली. यावेळी आकांक्षा नवले पाटील व अमृता धानोरकर या मुलींनी महामोर्चास संबोधित केले.
अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने उपजिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासारसाई-हिंजवडी, ता.मावळ जि.पुणे येथील ऊसतोड कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास कडक शासन करून त्यांना फाशी द्यावी, हा खटला जलदगती कोर्टात चालवावा, पीडित कुटूंबाच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेवून त्यांना अर्थसहाय्य देण्यात यावे, पीडित कुटूंबाचे पुनर्वसन करावे. सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या. निवेदनावर अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती, अनंतराव घुले, गोविंद इप्पर, प्रा.नारायण सिरसाट, अनिरूध्द फड, सुधीर माले, दिनेश कराड, विजय चाटे, स्वप्निल बडे, श्रीकांत नागरगोजे, अ‍ॅड.सचिन शेप, अ‍ॅड.अशोक मुंडे, अविनाश गित्तेसह ५० पेक्षा जास्त लोकांच्या स्वाक्षºया निवेदनावर आहेत.

Web Title: Ambajogai Mahamarcha in protest of the incident of Hinjewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.