स्वातंत्र्यानंतर प्रथमच अंबाजोगाई ते मंगाईवाडी बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:32+5:302021-08-19T04:36:32+5:30

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली गावात बस लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यातील मंगाईवाडी गावात भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ ...

Ambajogai to Mangaiwadi bus service started for the first time after independence | स्वातंत्र्यानंतर प्रथमच अंबाजोगाई ते मंगाईवाडी बससेवा सुरू

स्वातंत्र्यानंतर प्रथमच अंबाजोगाई ते मंगाईवाडी बससेवा सुरू

googlenewsNext

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली गावात बस

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : तालुक्यातील मंगाईवाडी गावात भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनंतर मंगळवारी गावात एसटी बस पोहोचली. बसचे स्वागत करून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

मंगाईवाडी हे गाव तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. डोंगरकुशीतील असलेल्या या गावात आजपर्यंत कधीच एसटी बस पोहोचलीच नव्हती. मंगळवारी (१७ ऑगस्ट) बसच्या नियमित फेऱ्यांना सुरुवात झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले. बससेवा सुरू करण्यासाठी कै. यशवंतराव चव्हाण विश्वस्त मंडळ, बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजपालजी लोमटे, दिलीप लव्हारे, आगारप्रमुख नवनाथ चौरे, नियंत्रक सहायक राऊत, भागवत मोरे, पंचायत समिती सदस्य व्यंकटेश चामनर, सुभाष गडदे, संभाजी शिंदे यांनी प्रयत्न केले.

बसच्या स्वागतावेळी मुख्याध्यापक आर.बी. पठाण, नामदेव मोरे, नानासाहेब वाघ, प्रशांत देशपांडे, अनंत जोशी, प्रकाश सूर्यवंशी, अरुण जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश मेढे यांनी केले, एस.जे. सोन्नर यांनी आभार मानले.

180821\img-20210818-wa0038.jpg

बससेवा सुरू झाली

Web Title: Ambajogai to Mangaiwadi bus service started for the first time after independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.