अंबाजोगाई, पाडळसिंगीत घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:24 AM2018-10-09T00:24:19+5:302018-10-09T00:24:49+5:30

स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील हैदराबाद बँक कॉलनीत रविवारी पहाटे उघडकीस आली आहे.

Ambajogai, pansling houses in the house | अंबाजोगाई, पाडळसिंगीत घरे फोडली

अंबाजोगाई, पाडळसिंगीत घरे फोडली

Next
ठळक मुद्देदोन गुन्ह्यांत साडेतीन लाखांचा ऐवज चोरी : वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी उपायांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई / पाडळसिंगी : स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील हैदराबाद बँक कॉलनीत रविवारी पहाटे उघडकीस आली आहे. तसेच गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे शनिवारी सायंकाळी शेतकºयाच्या घराचे कुलूप तोडून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला. मागील काही दिवसात चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत.
अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर हैदराबाद बँक कॉलनी भागात गुत्तेदार माधव मारोतीराव होळंबे यांचे घर आहे. त्यांना दोन मुले असून, शनिवारी एक मुलगा बाहेरगावी गेलेला होता तर दुसरा मुलगा त्यांच्या स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये गेलेला होता. रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर माधवराव होळंबे झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला. होळंबे झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेत दोरीने बांधून टाकला. त्यानंतर त्यांच्या मुलाच्या खोलीत प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्याचे बिनले, बाजूबंद, लॉकेट, अंगठ्या असे एकूण २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास जाग आल्यानंतर होळंबे यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मुलगा सूरज यांना फोन करून हॉस्पिटलमधून बोलावून घेतले. सुरज हे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी माधवराव होळंबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कुटुंब शेतात गेले, चोरट्यांनी घर साफ केले
गेवराई: घरातील सर्व सदस्य शेतात केलेल्या घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूचे दार तोडून घरात प्रवेश करत दीड लाखांचा ऐवज लंपास केली. ही घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली.
पाडळसिंगी येथील शेतकरी मोतीराम नारायण बजगुडे यांची पत्नी शनिवारी (दि. ६) सकाळी कापूस वेचणीसाठी शेतात गेली होती. त्यानंतर दुपारी चार वाजता मोतीराम बजगुडे हे देखील घराला कुलूप लावून शेतात गेले. यावेळी घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. डुप्लिकेट चावीच्या साह्याने कपाटातील लॉकर उघडून आतील एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे गंठण व बोरमाळ असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी सहा वाजता मोतीराम बजगुडे हे घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी बजगुडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चोरटे पुन्हा सक्रिय
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अंबाजोगाई शहरातील एका व्यापाºयाचे पाच लाख रुपये लुटण्याचा गुन्हा घडला होता. त्यानंतर एका व्यक्तीचे ४० हजार रुपये लंपास करण्यात आले. मागील आठवड्यात मोंढ्यातील एका व्यापाºयाच्या चार लाखांवरही चोरट्यांनी डल्ला मारला. त्यानंतर रविवारी पहाटे होळंबे यांच्या घरी चोरी झाली. एकामागून एक झालेल्या चोरीच्या घटनात आतापर्यंत लाखोंची रक्कम चोरीला गेली आहे. चोरीच्या घटना पुन्हा वाढ झाल्याने शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले.

Web Title: Ambajogai, pansling houses in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.