अंबाजोगाईत वेश्या व्यवसायाचा लॉजमध्येच अड्डा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:56 AM2017-12-06T00:56:34+5:302017-12-06T00:56:42+5:30

अंबाजोगाईत मागील काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे समोर येत आहे. दीड महिन्यापूर्वीच एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांसह तीन ग्राहकांना ताब्यात घेतले होते.

Ambajogai prostitution business in the Lodge! | अंबाजोगाईत वेश्या व्यवसायाचा लॉजमध्येच अड्डा !

अंबाजोगाईत वेश्या व्यवसायाचा लॉजमध्येच अड्डा !

googlenewsNext
ठळक मुद्देदोन महिलांसह ग्राहक, मालक, चालक जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड/अंबाजोगाई : अंबाजोगाईत मागील काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे समोर येत आहे. दीड महिन्यापूर्वीच एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांसह तीन ग्राहकांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी पुन्हा प्रशांत नगर भागातील एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये लॉज मालक, चालक, ग्राहक व दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी केली.
अंबाजोगाई शहरातील बसस्थानकासमोरच १० आॅक्टोबर रोजी एका लॉजवर छापा टाकण्यात आला होता. यामध्ये दोन महिलांची सुटका करून तीन ग्राहकांना ताब्यात घेतले होते.
या कारवाईने शहरात खळबळ उडाली होती. परंतु पुन्हा याच परिसरात बसस्थानकाच्या पाठिमागे ‘जनता’साठी असलेल्या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला समजली. त्यांनी याबाबत खात्री केली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना ही माहिती देऊन कारवाईसाठी सापळा रचला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते, भारत माने, देवकन्या मैंदाड (अंबाजोगाई शहर), निलावती खटाणे, शेख शमिम पाशा, विकास नेवडे यांनी केली.
डमी ग्राहक पाठवून कारवाई
मंगळवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक विशाल आनंद यांनी एक डमी ग्राहक लॉजवर पाठविला. त्याला योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी डमी ग्राहकाकडून पोलिसांना खात्री पटताच त्यांनी लॉजवर छापा टाकला. यामध्ये एक ग्राहक व दोन महिला आढळून आल्या. तसेच लॉज मालक नारायण व्यंकटराव गुडे (६५) व लॉज मॅनेजर सचिन जगन्नाथ दुधाने (३०) या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांच्या फिर्यादीवरून मालक गुडे व मॅनेजर दुधाने व एका ग्राहकाविरूद्ध अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुकानातून ठेवली नजर
‘जनता’साठी असलेल्या या लॉजच्या बाहेरील एका दुकानात पोलीस दबा धरून बसलेले होते. डमी ग्राहकाकडून खात्री पटताच सर्वांनीच लॉजवर छापा टाकून महिलांची सुटका करीत ग्राहक व लॉज मालक, चालक यांना जेरबंद केले. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील लॉजवर असे प्रकार राजरोस चालत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर सापळा रचून टाकला छापा.

Web Title: Ambajogai prostitution business in the Lodge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.