लातुरच्या सिंचनासाठी अंबाजोगाईकर वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:26+5:302021-05-22T04:31:26+5:30

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर ...

Ambajogaikar for irrigation of Latur | लातुरच्या सिंचनासाठी अंबाजोगाईकर वेठीला

लातुरच्या सिंचनासाठी अंबाजोगाईकर वेठीला

Next

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर जिल्ह्यात जावे. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील १० गावचा वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला आहे. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. लातुरच्या पाण्यासाठी अंबाजोगाई तालुक्याला वेठीस धरण्याचा हा अनोखा प्रकार इथल्या सिंचनासाठी त्रासदायक ठरू लागला आहे.

तालुक्यात पाटोदा शिवारात मांजरा धरणाच्या कालव्याचे पाणी पुढील शेतकऱ्यांना जावे म्हणून पाटबंधारे विभागाच्या सुचनेनुसार महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ज्यांचा कालव्याशी संबंधच नाही,अशा शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे. विहीर व इंधन विहिरीला पाणी असतानाही वीज पुरवठा बंद असल्याने ऊस वाळत असल्याची मोठी ओरड होत आहे. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय नुकसानदायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

दहा गावांमधील वीजपुरवठा ठप्प

मांजरा धरणातून सोडलेले पाणी पाणी पुढे लातुरकडे वेगाने वाहत जावे म्हणून धरणाच्या लाभक्षेत्रातील अकोला,धानोरा,आपेगाव,वांगदरी,इसळ, सौदंना,बनसरोळा, नायगाव,धनेगाव,आवाड शिरपुरा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणी सुटलेले असतानाही या गावांना या पाण्याचा लाभ घेता येईना.तर इतर शेतकऱ्यांना ही वीजपुरवठा खंडित झाल्याने विहिरींचे पाणी ही उसाला देता येईना.

वीजपुरवठा सुरळीत करा

वीजपुरवठा खंडित झाल्याने अंबाजोगाई व केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.लातुर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कॅनॉल वरील शेतीपंपाचे कनेक्शन कट करण्याचे आदेश त्वरीत रद्द करावेत तसेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी एका पत्राद्वारे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

Web Title: Ambajogaikar for irrigation of Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.