अंबाजोगाईकर करतात कोरोनाच्या चाचणीवर दिवसाला १२ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:18+5:302021-03-31T04:34:18+5:30

दैनंदिन हजारापेक्षा जास्त चाचण्या अंबाजोगाई - अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण बीड ...

Ambajogaikar spends Rs 12 lakh a day on corona testing | अंबाजोगाईकर करतात कोरोनाच्या चाचणीवर दिवसाला १२ लाखांचा खर्च

अंबाजोगाईकर करतात कोरोनाच्या चाचणीवर दिवसाला १२ लाखांचा खर्च

Next

दैनंदिन हजारापेक्षा जास्त चाचण्या

अंबाजोगाई - अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या होतात. दररोज किमान एक हजारापेक्षा जास्त चाचण्या सुरू आहेत. प्रत्येक चाचणीसाठी १२०० ते १२५० रुपये खर्च येतो. हा सर्व खर्च शासनामार्फत होतो. त्यामुळे शासनाला दररोज कोरोनाच्या चाचण्यांसाठी १२ ते साडेबारा हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

बीड जिल्ह्यात एकही खाजगी प्रयोगशाळा नसल्याने जिल्ह्यातील सर्व चाचण्या शासनाच्या वतीनेच केल्या जातात.

जून २०२० मध्ये अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली. या प्रयोगशाळेची क्षमता दररोज २०० चाचण्या करण्याची आहे, तरीही २४ तास सेवा देत दररोज एक हजारापेक्षा जास्त चाचण्या केल्या जातात. प्रयोगशाळेच्या प्रारंभीपासून आजपर्यंत एक लाख २१ हजार ३७८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १२ हजार १४३ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

बीड जिल्ह्यात कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला कोरोना चाचण्यांची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या फक्त अंबाजोगाईतच होतात, तर रॅपिड अँटिजन टेस्टची सुविधा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आली आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या वतीने व्यापारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक बँकेतील कर्मचारी अशा विविध लोकांच्या चाचण्या करण्यासाठी केलेली सक्ती व वाढती रुग्णसंख्या यामुळे दिवसेंदिवस चाचण्यांची संख्याही वाढूच लागली आहे. बीड जिल्ह्यातील संपूर्ण चाचण्या शासकीय यंत्रणेच्या वतीने होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना कसलाही आर्थिक भुर्दंड बसत नाही. याचा जिल्हावासीयांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे.

आणखी एका प्रयोगशाळेची आवश्यकता

बीड जिल्ह्याची व्याप्ती व वाढती कोरोना रुग्णसंख्या यामुळे जिल्ह्यात आणखी एका कोरोना विषाणू प्रयोगशाळेची नितांत आवश्यकता आहे. अंबाजोगाईत सर्वच तालुक्यांतून स्वॅब तपासणीसाठी येतात. आष्टी ते अंबाजोगाई, आष्टी ते पाटोदा, आष्टी ते गेवराई या तालुक्यांना तपासणीसाठी व स्वॅब पाठविण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते. वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. स्वॅब वेळेत उपलब्ध झाले तर त्याच्या चाचण्याही लवकर होतात. मात्र, उशिरा आलेल्या स्वॅबमुळे चाचणीचा अहवाल देण्यासाठी मोठा विलंब लागतो. यासाठी बीड येथे कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेची नितांत आवश्यकता आहे.

एकाच आठवड्यात १४,७२६ चाचण्या

बीड जिल्ह्यात एकाच आठवड्यात संशयित कोरोना रुग्णांच्या १४,७२६ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. यात २२६९ जण कोरोनाबाधित निघाले. अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर ८२३४ चाचण्या करण्यात आल्या. यात ११५७ जण बाधित निघाले तर अँटिजन टेस्टमधून १११२ जण बाधित आहेत.

अशी आहे

आकडेवारी

दररोज होणाऱ्या चाचण्या - १५०० ते १८००

आरटीपीसीआर - १२०० अँटिजन - ३०० ते ३५०

आठवडाभरात झालेल्या चाचण्या - १४७२६

Web Title: Ambajogaikar spends Rs 12 lakh a day on corona testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.