अंबाजोगाईची कन्या ईशा लोहिया पोहोचली एव्हरेस्ट बेस कॅम्पवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 07:44 PM2021-10-19T19:44:24+5:302021-10-19T19:56:05+5:30
समुद्र सपाटीपासून १८ हजार ५१३ फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट पर्वतावरील बेस कॅम्प आहे.
अंबाजोगाई ( बीड ) : सर्वांत उंच असलेल्या एव्हरेस्ट पर्वतावर दमदार चढाई केल्याबद्दल अंबाजोगाई ची कन्या ईशा अनिकेत लोहिया हिचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. समुद्र सपाटीपासून १८ हजार ५१३ फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट पर्वतावरील बेस कॅम्प आहे. हे ठिकाण पायी चढाई करून सर करण्याचा पराक्रम अंबाजोगाई च्या सुकन्या ईशा अनिकेत लोहिया हिने केला आहे.विशेष म्हणजे १५ दिवस १४ राञी मिळून या दक्षिण (काठमांडू)कॅम्पसाठी सहभागी झालेल्या १६ जणांच्या पथकामध्ये सर्वात कमी वयाची कॅम्पर म्हणून ईशा लोहिया हिची नोंद झाली आहे.
मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांची ती कन्या आहे. अत्यंत कमी वयात एव्हरेस्ट पर्वत रांगांवर सर (बेस कॅम्प) पायी चढाई केल्याबद्दल तिचे सर्वत्र स्वागत होत आहे.