अंबासाखरची कर्जमुक्तीकडे वाटचाल : रमेश आडसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:49+5:302021-04-01T04:33:49+5:30
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी शेतकरी व सभासदांशी संवाद साधताना रमेश आडसकर ...
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी शेतकरी व सभासदांशी संवाद साधताना रमेश आडसकर बोलत होते. गेल्या २० वर्षांपासून साखर कारखान्याला कोणत्याही मोठ्या बँकेची मदत नाही. तरी साखर कारखाना सुस्थितीत चालू आहे. भविष्यात ही संस्था वाचविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. ऊस उत्पादकांना इतर कारखान्यांप्रमाणे भाव देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. शेतकरी ऊस उत्पादक यांनी साखर कारखान्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरविणार आहोत, अत्यंत कठीण परिस्थितीत साखर कारखान्याची स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला यश आले. बीड जिल्ह्यातील हा पहिला साखर कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आगामी काळात शेतकरी व ऊस उत्पादकांनी साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, असे आडसकर म्हणाले. यावेळी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. बी. साखरे यांच्यासह सभासदांची उपस्थिती होती.
===Photopath===
310321\avinash mudegaonkar_img-20210330-wa0037_14.jpg
===Caption===
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने झाली. मार्गदर्शन करताना चेअरमन रमेश आडसकर.