भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल अमेरिकन प्रशासनास कौतूक : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:35 AM2018-12-13T00:35:11+5:302018-12-13T00:35:51+5:30

मोठी लोकसंख्या आणि भू-क्षेत्र असलेल्या भारताच्या प्रशासकीय सेवा आणि अंमलबजावणीबद्दल अमेरिकन अभ्यासकांमध्ये प्रचंड कौतूक आहे. अवाढव्य लोकसंख्या आणि क्षेत्र असूनही देशपातळीवर पोलिओ, रुबेला लस, निवडणूक प्रणाली आणि यासारख्या इतर योजना, मोहिमा भारतीय प्रशासनातर्फे सहजपणे कशा राबविल्या जातात, याबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा करून आश्चर्य व्यक्त केले, असे बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

American administration appreciates Indian Administrative Service: Collector M.D.Singh | भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल अमेरिकन प्रशासनास कौतूक : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल अमेरिकन प्रशासनास कौतूक : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

googlenewsNext
ठळक मुद्देन्युयॉर्क येथील अभ्यास दौरा : सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निवड; ‘लोकमत’शी केली चर्चा

सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मोठी लोकसंख्या आणि भू-क्षेत्र असलेल्या भारताच्या प्रशासकीय सेवा आणि अंमलबजावणीबद्दल अमेरिकन अभ्यासकांमध्ये प्रचंड कौतूक आहे. अवाढव्य लोकसंख्या आणि क्षेत्र असूनही देशपातळीवर पोलिओ, रुबेला लस, निवडणूक प्रणाली आणि यासारख्या इतर योजना, मोहिमा भारतीय प्रशासनातर्फे सहजपणे कशा राबविल्या जातात, याबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा करून आश्चर्य व्यक्त केले, असे बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राष्टÑीय पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्ह्याचा संपूर्ण देशात प्रथम क्रमांक आला होता. याबद्दल जिल्हाधिकारी सिंग यांचा काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत सत्कार झाला होता. याच योजनेत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या त्यांच्या सोबतच्या देशातील सात जिल्हाधिकारी यांना केंद्र शासनातर्फे अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी पाठविले होते. शंभर वर्षांचा इतिहास असलेले आणि पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये जगात अव्वल असलेल्या न्युयॉर्कमधील मॅक्सवेल सिराक्यूस युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासासाठी सिंह यांची निवड झाली होती. आठ दिवसांच्या आपल्या वास्तव्यात त्यांनी अमेरिका आणि भारत यांची प्रशासकीय सेवा, निर्णय, अंमलबजावणी, नियम, उपायोजना, कायदे आदि संदर्भात तुलनात्मक अभ्यास केला.
अमेरिकेतील विविध संस्था, संघटना, कंपन्यांना भेटी देऊन त्यांची कार्यप्रणाली समजून घेतली. तेथील अभ्यासक अमेरिकन प्रशासकीय सेवेवर पाहिजे तेवढे खूष नाहीत तर त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल खूप आदर आहे. या युनिव्हर्सिटीचे डीन तब्बल ७५ वेळा भारतात अभ्यासासाठी आले होते. एवढ्या मोठ्या अवाढव्य भारत देशात सर्वकाही सुरळीत चालू असते, अशा प्रतिक्रिया त्यांच्याशी चर्चा करताना ऐकावयास मिळाल्या, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सांगितले.

Web Title: American administration appreciates Indian Administrative Service: Collector M.D.Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.