पोषण आहाराची रक्कम जमा होणार, पण आधार नोंदणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:06+5:302021-07-16T04:24:06+5:30

अनेक जिल्ह्यात बँकांची मर्यादित उपलब्धता, तसेच कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने १ जुलै रोजी सुधारित निर्देश जारी केले ...

The amount of nutritious food will be credited, but Aadhaar registration is required | पोषण आहाराची रक्कम जमा होणार, पण आधार नोंदणी आवश्यक

पोषण आहाराची रक्कम जमा होणार, पण आधार नोंदणी आवश्यक

Next

अनेक जिल्ह्यात बँकांची मर्यादित उपलब्धता, तसेच कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने १ जुलै रोजी सुधारित निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार थेट लाभ हस्तांतरण उपक्रमांतर्गत शालेय पोषण आहार योजनेत पात्र सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संकलित करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लेखी सूचना निर्गमित करण्याचे निर्देश शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

काय आहेत सुधारित निर्देश

ज्या मुलांची आधार नोंद आहे; पण बँक खाते नाही (दहा वर्षांखालील मुले) अशा विद्यार्थ्यांना लाभ त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ज्या मुलांची आधार नोंदणी नाही त्यांची आधार नोंदणी झाल्यानंतरच वरीलप्रमाणे त्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी बँक उपलब्ध नाहीत या ठिकाणी आधार नोंदणी असलेल्या मुलांच्या त्यांच्या पालकांच्या संयुक्त टपाल खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँक उपलब्ध नाही अशा ठिकाणी स्थानिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा सहकारी बँक खात्याचा उपयोग थेट लाभ हस्तांतरण योजनेसाठी करता येणार आहे.

-------------

शालेय पोषण आहाराच्या तुटपुंज्या रकमेसाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याबाबत आधी आदेश दिले होते. दीडशे ते तीनशे रुपयांसाठी लाभार्थ्याला किमान एक हजार रुपये लागणार होते. यातच बँकांकडून विविध अडचणींमुळे खाते उघडणे टाळले जात होते. पालकांच्या तक्रारीनंतर हा बदल केला असला, तरी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार खाते नाेंदणीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.

---------------

Web Title: The amount of nutritious food will be credited, but Aadhaar registration is required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.