पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यात जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:41+5:302021-07-16T04:23:41+5:30

बीड : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणारी रक्कम ही पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ...

The amount of nutritious food will be credited to the parent's account | पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यात जमा होणार

पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यात जमा होणार

Next

बीड : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणारी रक्कम ही पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. राहुल वायकर यांनी शालेय पोषण आहार अधीक्षक अजय बहीर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून शालेय पोषण आहार अंतर्गत २०२१ उन्हाळी सुटीतील विद्यार्थ्यांना लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट पालकांच्या खात्यात जमा करण्याचे शिक्षण संचालकांनी निर्देश दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

दीडशे ते तीनशे रुपयासाठी अगोदर पालकांना एक हजार रुपये नवे खाते उघडण्यासाठी मोजावे लागणार होते. केंद्र शासनाच्या नियोजनाप्रमाणे योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात उन्हाळी सुटीच्या कालावधीचा आहार सर्वच खर्चाची रक्कम हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासन निर्देशानुसार सर्व तालुक्यातील पोषण आहार योजनेत पात्र सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक बँक खाती विहित नमुन्यात अद्यावत करून तयार ठेवावे. तसेच ज्यांची खाते उघडलेले नसेल अशा विद्यार्थ्यांचे आधार लिंक बँक खाते उघडण्याचे आदेश मागे घेऊन पालकांचे खाते क्रमांक देण्यास मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, बँक खाते उघडण्यासाठी एक हजार रुपये लागतात आणि दीडशे ते तीनशे रुपयांसाठी एक हजार रुपयाची खाती बँकेत काढण्यासाठी जमा करावी लागणार हा निर्णय अत्यंत चुकीचा होता. शिक्षण संचालकांनी हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा द्यावी, अशी मागणी केल्यानंतर आता नवीन परिपत्रकान्वये पालकांचे खाते क्रमांक देण्यास मुभा देण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. राहुल वाईकर यांनी दिली आहे.

Web Title: The amount of nutritious food will be credited to the parent's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.