वीज तांत्रिक कामगार युनियनच्या अध्यक्षपदी अमृतराजे आजबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:40+5:302021-08-15T04:34:40+5:30
आष्टी : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार युनियनच्या अध्यक्षपदी अमृतराजे आजबे यांची, तर सचिवपदी शिवाजी गोरे यांची निवड झाली ...
आष्टी : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार युनियनच्या अध्यक्षपदी अमृतराजे आजबे यांची, तर सचिवपदी शिवाजी गोरे यांची निवड झाली आहे.
तांत्रिक कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस जहिरोद्दीन व राज्य सचिव भाऊसाहेब भाकरे यांच्या नेतृत्वाखाली व राज्य संघटन सचिव उदय मदुरे, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन खिळे, मार्गदर्शक भाऊसाहेब निंबाळकर, सर्कल अध्यक्ष विकास शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रशांत पोकळे, सचिव सुनील वाघमारे, उपाध्यक्ष विठ्ठल शेंबडे, संघटक शाकेरभाई यांच्या सूचनेनुसार आष्टी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी सोमा शिंदे, कार्याध्यक्षपदी अमोल कर्डिले, कोषाध्यक्ष शिवाजी मार्कंडे, तालुका संघटक अशोक काकडे, विष्णू कर्डिले, राहुल भोसले, चंद्रकात करडकर, अभिमान गदादे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता दसपुते, सहायक अभियंता पांडे, युनुस सय्यद, महेश घोडके, बाळू धुमाळ, शहाजी कर्डिले, अतुल हराळ, विशाल राऊत, महेश टेकाळे, संतोष कर्डिले, जिल्हाध्यक्ष किशोर साप्ते, मनोज निंबाळकर, अर्जुन थोरात, गौतम भवर, प्रशांत निंबाळकर, सचिन जाधव, संचित भराटे उपस्थित होते.
140821\img-20210814-wa0255_14.jpg