८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:19 PM2023-08-17T16:19:44+5:302023-08-17T16:21:35+5:30
बीडमध्ये आज राष्ट्रवादीची स्वाभीमानी सभा होतं आहे.
बीड- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. या फुटीनंतर खासदार शरद पवार पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर गेले आहेत, बीडमध्ये आज राष्ट्रवादीची स्वाभीमानी सभा होतं आहे. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांची उपस्थिती आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री राजेश टोपे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले
बीडमधील सभेत बोलताना आमदार राजेश टोपे यांनी भावूक होऊन बीडमधील कार्यकर्त्यांना साद घातली. आमदार राजेश टोपे म्हणाले, शरद पवार यांच उभं आयुष्य विचारांचं राजकारण केलं आहे, त्यांनी बाबासाहेब आंबडकर यांच्या मुल आधारावर काम केलं. ज्या तत्वासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. तिच विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, पवार साहेबांनी सर्वांसाठी काम केलं. कितीही संकट आली तरीही त्यांनी काम केलं. म्हणून शरद पवार साहेबांसोबत आज आपण रहायचे आहे, असंही टोपे म्हणाले.
'पवार साहेबांना तुमच्या सर्वांच्या आधाराची गरज आहे. आज ८३ वर्षांचा योद्धा एक विचारांची बांधीलकी घेऊन आपला आर्शीर्वाद मागायला आले आहेत, तो आर्शीर्वाद आपण देऊया, असं भावूक होऊन आवाहन आमदार टोपे यांनी केलं.
'शिंदे-फडणवीस सरकारकडून अनेक आश्वासने देण्यात आली, पण अजुनही पूर्ण केलेली नाही. आपल्याला या सरकारने वाळू ६५० रुपयांना देतो म्हणून सांगितलं पण अजुनही एवढ्या पैशात मिळत नाही. राज्य सरकारने सांगितलं सर्व जागा भरणार, केंद्र सरकारनेही सांगितलं सर्व जागा भरणार पण अजुनही जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे आता आपल्याला सर्वांना एकत्र राहावं लागेल, असंही आमदार राजेश टोपे म्हणाले.