दारू पिऊ नको म्हणून बजावल्याने गेला जीव; संतापलेल्या नातवाने आजोबांचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 06:31 PM2024-03-05T18:31:40+5:302024-03-05T18:35:51+5:30

दारूवरुन शिवीगाळ केल्याने पुन्हा दारू पिऊन केला आजोबाचा खून

An enraged grandson killed his grandfather due to stop alcohol drinking | दारू पिऊ नको म्हणून बजावल्याने गेला जीव; संतापलेल्या नातवाने आजोबांचा केला खून

दारू पिऊ नको म्हणून बजावल्याने गेला जीव; संतापलेल्या नातवाने आजोबांचा केला खून

- मधुकर सिरसट
केज :
 येथील वकीलवाडी परीसरातील सिद्धीविनायक मंदिरासमोर दर्शनासाठी आलेल्या आजोबाच्या डोक्यात व मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार करून नातवाने खून केल्याची घटना मंगळवारी (दि.5) सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. त्यानंतर आरोपी नातवाने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. गिरधारी किसनलाल शिल्लक असे मृताचे नाव आहे.

गिरधारी किसनलाल शिल्लक ( 60) आज सकाळी  साडेसात वाजेच्या सुमारास  वकीलवाडी भागातील कानडी रोडलगत असलेल्या सिद्धी विनायक मंदिरात दर्शनासाठी  आले होते. देवदर्शन करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर येताच दबा धरून बसलेला चुलत नातू रोहित रतन शिल्लक  ( 25 वर्षे. रा.केज) याने गिरधारी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गिरधारी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर रोहीतने थेट केज पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले. ठाणे अंमलदार सुधाकर दौंड यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना दिली. पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, आनंद शिंदे, पोलीस नाईक संतोष गिते,  मतीन शेख ,प्रकाश मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नातेवाईकांनी गंभीर अवस्थेतील गिरधारी यांना थेट अंबाजोगाई येथील स्वाराति ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासणी करुन डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. 

१३ वार केल्याची कबुली...!
तू खुप व्यसनी आहेस, दारु पिने बंद कर, असे म्हणत आजोबांनी रात्री आई-बहीणीवरुन  शिवीगाळ केल्याने पहाटेच पुन्हा दारु पिलो, गांजा ओढला. त्यानंतर रागाच्या भरातच आजोबाच्या डोक्यात आणि मानेवर 13 वार केले, अशी कबुली आरोपी रोहित याने दिली. तो रक्ताने माखलेले हात, रक्ताने भरलेल्या कपड्यांसह पोलीस स्टेशनला हजर झाला होता.

Web Title: An enraged grandson killed his grandfather due to stop alcohol drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.