आनंदगावात दोन शेतकऱ्यांचा तेरा एकर ऊस, ठिबक साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:52 AM2018-11-24T00:52:23+5:302018-11-24T00:52:51+5:30
विजेची तार पडल्यामुळे दोन शेतकºयांचा तेरा एकर ऊस जळून खाक झाला. तसेच ठिबक साहित्यही जळाले. ही घटना माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगामसला : विजेची तार पडल्यामुळे दोन शेतकºयांचा तेरा एकर ऊस जळून खाक झाला. तसेच ठिबक साहित्यही जळाले. ही घटना माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
आनंदगाव येथील गट नं. १४३ मध्ये शेतकरी सुनिल किसनराव थावरे व मुंजाभाऊ बाबासाहेब थावरे यांच्या जमिनी आहेत. शुक्रवारी वीज तार पडल्यामुळे सुनिल थावरे यांचा ९ एकर व ठिबक साहित्य, तर मुंजाभाऊ थावरे यांचा ४ एकर ऊस खाक झाला आहे. या ऊस जळीताचा पंचनामा आनंदगाव सज्जाचे तलाठी संघर्ष ओवे यांनी केला आहे.
सुनिल थावरे यांचे ऊसाचे १२ लाख व ठिबक साहित्याचे ६ लाख असे एकूण १८ लाखाचे आणि मुंजाभाऊ थावरे यांचे ४ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे असे पंचनाम्यात नमूद केले आहे. संबंधित शेतकºयांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.