उत्तम आरोग्य सेवेसाठी ‘आनापान’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:32 AM2019-04-07T00:32:03+5:302019-04-07T00:33:05+5:30
यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही थीम जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य सेवेचा वापर करुन सर्वांना संपूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आहे.
बीड : यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही थीम जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य सेवेचा वापर करुन सर्वांना संपूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आहे. सर्वांना आरोग्य देण्याआधी सर्वांना उचित व योग्य आरोग्य सेवा देण्याचा हा संकल्प असून या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मन संतुलित राखण्यासाठी आनापान साधना उपक्रम राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त धकाधकीच्या जीवनात उद्भवणाºया आजारांकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. सर्व जीवनशैलीचे आजार असल्याने वर्तणुकीत बदल होणे आवश्यक आहे. आहार आणि विहारात बदल करुन अतिरक्तदाब, मधुमेह, स्थौल्य आदी कारणांमुळे होणारे हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायूचे आजार टाळू शकतो. आजार टाळण्यासाठी व्यायाम किंवा योगा करणे, ध्यान करणे आवश्यक आहे. तसेच साखर, मीठ, तंबाखु, दारु, शीतपेय टाळणे महत्वाचे आहे. बदलत्या लाईफस्टाईलमध्ये रुग्णांना शिस्त लावता येत नसल्याने आरोग्य विभागाने आता प्राथमिक आरोग्य उपचारावर भर देण्याचा संकल्प केला आहे.
रुग्णांना सुधारताना स्वत: ला संतुलित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवेच्या तत्वांचे पालन करणाºया बाबींवर आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांना लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जनतेला पुरेशी आरोग्य सेवा देण्यासाठी विशेषत: दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्याबरोबरच डॉक्टरांना निवासी सोय उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती आहेत. काही बांधकाम प्रगतीपथावर आहे. तेथे डॉक्टर व कर्मचाºयांना निवास व्यवस्था करुन ग्रामीण रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
आनापानचा अनुभव रुग्ण, नातेवाईकांना द्या
श्वास प्रश्वासावर फक्त नियंत्रण ठेवणे, सर्वांना स्वीकाराह्य असणारे सोपे, स्वस्त परवडणारे, उपलब्ध असणारे हे आनापान आहे. आपण आपलाच श्वास बघायचाय मग एकदा सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना ते आले की रुग्ण व नातेवाईकांनाही त्याचा अनुभव घ्यायला लावून सार्वत्रिक आरोग्य सेवेत याचा उपयोग करता येणार आहे.