अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांना मोबाईल केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:18+5:302021-08-21T04:38:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी दिलेले मोबाईल व्यवस्थित चालत नाहीत. आतील ॲपवर चुकीची माहिती आहे. ...

Anganwadi workers mobileized the officers back | अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांना मोबाईल केले परत

अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांना मोबाईल केले परत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी दिलेले मोबाईल व्यवस्थित चालत नाहीत. आतील ॲपवर चुकीची माहिती आहे. यामुळे हे मोबाईल शासनाला परत करण्याचा निर्णय राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने घेतला आहे. धारूर येथे शुक्रवारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांनी सामुदायिकपणे मोबाईल परत केले.

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बबनराव देशमुख उपस्थित होते. राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल देण्यात आले आहेत. हे मोबाईल गेल्या सात आठ महिन्यापासून व्यवस्थित चालत नव्हते. चुकीची माहिती ॲपवर भरल्या जात होती. या सर्व व्यवस्थेला अंगणवाडी सेविका त्रासून गेल्या होत्या. यामुळे राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने हे राज्यातील एक लाख मोबाईल परत शासनास देण्याचा व कागदावरच कामकाज करण्याचा निर्धार केला आहे. राज्य अध्यक्ष बबनराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष कमलताई बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, तालुकाध्यक्ष शामल जोंगदड यांच्या उपस्थितीत आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सुरूवात धारूर तालुक्यापासून करण्यात आली. धारूर येथे तालुक्यातील ६४ अंगणवाडी सेविकांचे मोबाईल पहिल्या टप्प्यात धारूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी लक्ष्मण कदम यांच्याकडे सामुदायिकपणे परत करण्यात आले. संघटनेच्या वतीने हे आंदोलन राज्यभर राबविण्यात येणार आहे.

याप्रसंगी राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे पदाधिकारी, तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मोबाईल परत केल्यावर कागदपत्रांवर नोंदी घेण्याचे सर्वांना सांगण्यात आले.

200821\img_20210820_142351.jpg

अंगणवाडी सेविकानी मोबाईल चालत नसल्याने मोबाईल केले बालविकास प्रकल्प अधिका-यास परत

Web Title: Anganwadi workers mobileized the officers back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.