केजमध्ये अंगणवाडीताईंनी केले मोबाइल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:39 AM2021-08-25T04:39:00+5:302021-08-25T04:39:00+5:30
अंगणवाडीताईंना ऑनलाइन कामासाठी शासनाच्या वतीने दिलेल्या मोबाइलमधील ॲप व्यवस्थित चालत नसल्याने चुकीच्या नोंदी होऊ लागल्याने, अंगणवाडीताईंनी हे मोबाइल शासनाला ...
अंगणवाडीताईंना ऑनलाइन कामासाठी शासनाच्या वतीने दिलेल्या मोबाइलमधील ॲप व्यवस्थित चालत नसल्याने चुकीच्या नोंदी होऊ लागल्याने, अंगणवाडीताईंनी हे मोबाइल शासनाला परत करण्याचे आंदोलन चालू केले आहे. या पार्श्वभूमीवर केजमध्ये मंगळवारी अंगणवाडीताईंनी त्यांना दिलेले मोबाइल आंदोलन करत, प्रकल्प अधिकाऱ्याकडे परत केले. यावेळी सिंधू घोळवे अनुसया वायबसे शेख इरफाना गैवरी भुजबळ आशा प्रतिभा आदीसह तालुक्यातील अंगणवाडी ताई यांनी मोठ्या संख्येने हजर राहून मोबाइल शासनास मोबाइल परत केले.
नवीन मोबाइलसह मराठी ॲपची मागणी
अंगणवाडीताईंनी नवीन मोबाइल देण्यात यावा, तसेच मोबाइलमध्ये ऑनलाइन काम करण्यासाठी मराठी भाषेतून ॲप देण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी जुने मोबाइल वापसी आंदोलन केले, अशी माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
240821\1828-img-20210824-wa0008.jpg~240821\1829-img-20210824-wa0011.jpg
केज मध्ये जुने मोबाईल पर्टवकर्तना अंगणवाडी ताईन~केज मध्ये अंगणवाडी ताईने आंदोलन करत त्यांना शासनाने दिलेले मोबाईल परत केले.