महागाईविरोधात एकल महिला संघटनेचा संताप मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:55+5:302021-07-28T04:34:55+5:30
एकल महिला संघटनेचा मोर्चा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाला. बसस्टँड, छत्रपती शिवाजी चौकमार्गे हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. ...
एकल महिला संघटनेचा मोर्चा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाला. बसस्टँड, छत्रपती शिवाजी चौकमार्गे हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चाचे नेतृत्व एकल महिला संघटनेच्या तालुका अध्यक्ष राजाबाई वाघमारे यांनी केले. या मोर्चात प्रजावती जोगदंड, शारदा सोनवणे, चित्रा पाटील, आशालता पांडे, आशा झिंजुर्डे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
मोर्चेकरांच्या मागण्या
वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे मोठ्या मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे वाढती महागाई कमी करावी, निराधार निवृत्तिवेतन योजनेचे अर्ज तत्काळ निकाली काढावेत, अन्नधान्य, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत, शिधापत्रिका वाटप केलेल्या कुटुंबांना धान्य उपलब्ध करून द्यावे, परित्यक्ता महिलांच्या निवृत्तिवेतन योजनेसंबंधी कागदपत्रांच्या पूर्ततेच्या जाचक अटी रद्ध करून विशेष बाब म्हणून ही प्रकरणे मंजूर करावीत, आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
270721\img-20210727-wa0050.jpg
वाढत्या महागाई च्या विरोधात महिलांचा संताप मोर्चा अंबाजोगाईत निघाला