अनिकेत लोहिया यांना ‘स्व. डाॅ. शंकरराव चव्हाण जलभूषण’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:31+5:302021-07-15T04:23:31+5:30

अनिकेत लोहिया यांनी जलसंधारणात केलेल्या अत्युत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. चार दशकांपूर्वी ‘मानवलोक’ ...

Aniket Lohia to ‘Self. Dr. Awarded Shankarrao Chavan Jalbhushan 'Award | अनिकेत लोहिया यांना ‘स्व. डाॅ. शंकरराव चव्हाण जलभूषण’ पुरस्कार प्रदान

अनिकेत लोहिया यांना ‘स्व. डाॅ. शंकरराव चव्हाण जलभूषण’ पुरस्कार प्रदान

Next

अनिकेत लोहिया यांनी जलसंधारणात केलेल्या अत्युत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. चार दशकांपूर्वी ‘मानवलोक’ उभारून डॉ. द्वारकादास लोहिया यांनी मराठवाड्यात दुष्काळ निवारणाचे प्रयत्न सुरू केले. जलसंधारणाची कामे करून त्यांनी अनेक गावे दुष्काळमुक्त केली. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत अनिकेत लोहिया यांनी मागील नऊ वर्षांत भूजल पुनर्भरण आणि पृष्ठभागाची पाण्याची क्षमता सुधारण्यासाठी विशेषतः ‘पाणलोट विकासासाठी’ जल क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. मराठवाड्यातील जलप्रकल्पातील गाळ काढून पाणीसाठा कसा वाढेल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांची स्व. डाॅ. शंकररावजी चव्हाण जलभूषण-२०२० च्या द्वितीय पुरस्कारासाठी निवड केली. मंगळवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात एका सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनिकेत लोहिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

140721\1132-img-20210713-wa0178.jpg

मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहिया यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार देण्यात आला

Web Title: Aniket Lohia to ‘Self. Dr. Awarded Shankarrao Chavan Jalbhushan 'Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.