नेकनूर येथील बाजारात जनावरांचे भाव कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:35 AM2019-09-24T00:35:50+5:302019-09-24T00:37:56+5:30
शेतशिवारात कुठेही चारा नसल्यामुळे त्यांना कसे जगवावे, याच विचारात बळीराजाची मती गुंग झाली आहे. जनावराच्या बाजारात भाव कोसळले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेकनूर : शेतशिवारात कुठेही चारा नसल्यामुळे त्यांना कसे जगवावे, याच विचारात बळीराजाची मती गुंग झाली आहे. जनावराच्या बाजारात भाव कोसळले होते.
अशा भीषण परिस्थितीत मुक्या जनावरांना आठवडी बाजारात विकण्याशिवाय अन्य पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला नाही. त्यामुळे त्यांनी नेकनूर येथील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर आपली जनावरे विक्रीसाठी आणली होती.
जिल्ह्यात यंदा आद्यपही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सध्या चाºयाचा आणि पाण्याचा बिकट बनला आहे.
नेकनूर येथील जनावरांच्या बाजारात बैलाच्या किमतीमध्ये खूप मोठी घसरण झाली आहे. बैलाची चांगली एक जोडी ९० ते ७० हजार रुपयांपर्यंत उतरली आहे. गाई म्हशीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे.
पाऊस नसल्यामुळे चारा ऊपलब्ध झालेला नाही.त्यामुळे पशुखाद्याच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे. या कारणाने आपले जनावरे बाजारामध्ये पाण्याअभावी आणि चा-याअभावी कवडीमोल भावामध्ये विक्रीसाठी बाजारांमध्ये घेऊन येत आहेत, अशी माहिती व्यापारी दत्ता काळे यांनी दिली.