पावसाळ्यात आहार बदलामुळे जनावरे आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:21+5:302021-07-14T04:38:21+5:30

बाजारात गर्दी; सामाजिक अंतर दिसेना वडवणी : खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. पिकांची उगवण झाली आहे. शेतकरी तयारीला ...

Animals get sick due to dietary changes in the rainy season | पावसाळ्यात आहार बदलामुळे जनावरे आजारी

पावसाळ्यात आहार बदलामुळे जनावरे आजारी

Next

बाजारात गर्दी; सामाजिक अंतर दिसेना

वडवणी : खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. पिकांची उगवण झाली आहे. शेतकरी तयारीला लागले असून शेतकरी कृषी दुकानात गर्दी करत आहेत. कापूस, सोयाबीन, तूर,मूग या पिकांना आवश्यक खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ वाढल्याने दुकानांवर सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे.

पुलांची उंची वाढविण्याची मागणी

वडवणी : तालुक्यातील मामला नदीवरील गावाजवळील पुलावर पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने अनेकवेळा रस्ता बंद पडतो. तसेच कमी उंचीच्या पुलामुळे धोका वाढला असून अपघात घडतात. या बाबींचा गांभीर्याने विचार करून या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी मामला ग्रामस्थांनी केली आहे.

प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर

गेवराई : महाराष्ट्र राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरिबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. किरकोळ तसेच ठोक विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

लसीकरण संथगतीने

वडवणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ग्रामीण भागात व शहरातील नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. लस उपलब्ध असतानाही ऑनलाईनच्या गोंधळामुळे नागरिक लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे दररोजचे उद्दिष्टदेखील पूर्ण होत नाही. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज आहे.

चालकांची कसरत,खड्ड्यायातून मार्ग

वडवणी : हरिश्चंद्र देवस्थानात जाणारा मुख्य रस्ता चिंचोटी गावापर्यंत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खडे पडल्याने चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Animals get sick due to dietary changes in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.