वसंतदादा पाटील महाविद्यालयात जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:27 AM2021-01-14T04:27:50+5:302021-01-14T04:27:50+5:30
बीड : येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयात मंगळवार, १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात ...
बीड : येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयात मंगळवार, १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळीराम राख होते. त्यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कुशाबा साळुंके, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. यादव घोडके, कार्यालय अधीक्षक अशोक पवार, मुख्य लिपिक अनिल क्षीरसागर आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. महादेव काळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. प्रा. डॉ. यादव घोडके यांनी राष्ट्रीय युवक दिनाचे महत्व सांगितले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. बळीराम राख यांनी केला. प्रा. डॉ. पल्लवी इरलापल्ले यांनी आभार मानले.