स्वच्छतेचा उपक्रम राबवत जयंती, पुण्यतिथी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:31+5:302021-04-13T04:31:31+5:30
धारूर : येथील कायाकल्प प्रतिष्ठानतर्फे येथील ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली ...
धारूर : येथील कायाकल्प प्रतिष्ठानतर्फे येथील ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. धारुर शहरातील ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्याचे वैभव अबाधित राखण्यासाठी कायाकल्प फाऊंडेशन तथा दुर्गप्रेमी़ सातत्याने श्रमदानाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. गेल्या एक वर्षापासून सामाजिक अंतर ठेवून दुर्गप्रेमी ऐतिहासिक किल्ल्यात दर रविवारी सकाळी दोन तास स्वच्छता अभियान राबवत आहेत. रविवारीही स्वच्छता अभियान राबवून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या अभियानात महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गोंदणे, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, सचिव विश्वानंद तोष्णिवाल, ज्ञानेश्वर शिंदे, अलंकार कामाजी, महेश गवळी, अक्षय बगाडे, गणेश कापसे व जलदूत विजय शिनगारे यांनी सहभाग घेतला.
===Photopath===
110421\3854img-20210411-wa0121_14.jpg~110421\3900img-20210411-wa0128_14.jpg