जयंती विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:33+5:302021-01-25T04:34:33+5:30
बीड : बीड येथील व्टिंकलिंग स्टार स्कूल येथे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गणेश मैड, वैभव अग्रवाल, ...
बीड : बीड येथील व्टिंकलिंग स्टार स्कूल येथे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गणेश मैड, वैभव अग्रवाल, अर्चना सावंत, कुलकर्णी, दीपा मिश्रा, रेखा शिंदे, शुभम फटाले, सचिन नैराळे, अनिल महागुरू, आदी उपस्थित होते.
शहर ठाण्यात प्रतिमापूजन
बीड : येथील शहर पोलीस ठाण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी पीएसआय पवनकुमार अंधारे, पोना राम आघाव, सहायक फौजदार चव्हाण, संजय राठोड, रामदास तांदळे, होमगार्ड सय्यद इलियास, शेख मिनाज, बापू चक्रे, आदी उपस्थित होते.
शारदा इंग्लिश स्कूल, केज
बीड : केज तालुक्यातील शारदा इंग्लिश स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी 'नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचे इयत्ता दहावीच्या मुलींना वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य एस. एम. मिश्रा, पी. एम. देशमुख, प्रा. बाबर प्रशांत, व्ही. टी. वीर, विजय हजारे, प्रणय पाणी, दिक्कत वर्षा, दिलीप ताटे, अशोक म्हेत्रे, दीपक खाडे, गणेश आकुसकर उपस्थित होते.
जय भवानी कन्या प्रशाला, केज
केज : येथे जयंती कार्यक्रम उत्साहात करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी. डी. धेंडे, के. वी. खुळे, आत्माराम नाईकनवरे, उत्तरेश्वर जाधव, मनोज बचुटे, स्नेहप्रभा पवार, चोंदे, पी. आर. देशमुख, व्ही. पी. देशमुख, बी. एम. शिंदे, एम. बी. गिराम, आदी उपस्थित होते.
शंकर विद्यालय, साळेगाव
बीड : केज तालुक्यातील साळेगाव येथील शंकर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वसंत पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सय्यद अकबर पटेल, आर. एन. गीते, प्रताप केंद्रे, के. के. म्हेत्रे, आर. आर. देशमुख, आदी उपस्थित होते.
माऊली दवाखान्यात अभिवादन
बीड : शहरातील माऊली दातांचा दवाखाना येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रवीण ढगे, डॉ. ज्योती खाडे, डॉ. हुमा, डॉ. शिल्पा घुले, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. हबीबा, सुरेखा देवधरे, मनीषा पाठक, शुभांगी राऊत, प्रियंका जोगदंड, आदी उपस्थित होते.
जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी
बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जी. काळे, कार्यालयीन अधीक्षक एस. एन. भारती यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रसायनशास्त्र विभागाचे प्रा. प्रमोद जाधव यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. मनोजकुमार नवसे, आभार प्रदर्शन प्रा. राजाभाऊ नागरगोजे यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.