बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंची घोषणाबाजी, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:12 AM2020-01-11T00:12:59+5:302020-01-11T00:13:35+5:30
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात हिंसाचार करणाºया गुंडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्र वारी रिपाइंच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर जोरदार निदर्शने करण्यात आली.
बीड : दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात हिंसाचार करणाºया गुंडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्र वारी रिपाइंच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर जोरदार निदर्शने करण्यात आली.
जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसह, महामंडळाचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार महात्मा फुले महामंडळासह सर्व महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे, शेतकºयांची सर्व कर्ज माफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच दिल्ली येथील जे. एन.यू. विद्यापीठात हिंसाचार करणाºया गुंडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशा मागण्या करत रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात राजु जोगदंड,किशन तांगडे,अविनाश जोगदंड,अमर विद्यागर, महेश आठवले, सुभाष तांगडे, माया मिसळे, विलास जोगदंड, गणेश वाघमारे, भैया म्हस्के, महेंद्र वडमारे,भाऊसाहेब दळवी, नामदेव वाघमारे, राजू वक्ते,भाऊसाहेब कांबळे, के.के. कांबळे,प्रभाकर चांदणे,अक्षय कांबळे,अण्णासाहेब सोनवणे,नागेश शिंदे, आनंद विध्यागर,भैया वाघमारे, अशोक दळवी,अंकुश शेंडगे, देवा वाघमारे, पप्पू वाघमारे, कपिल इनकर, बाबासाहेब ठोंबरे, चैतन चक्र े,लड्डू वडमारे, बीबीशन जावळे, विकास कोरडे, कैलास जोगदंड,रतन वाघमारे, दयानंद उजगरे,भिमराव घोडेराव, सचिन वडमारे,प्रवीण निसर्गंध, विनोद सवाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली.