बीडच्या पाच पोलीसांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल महासंचालकांचे पदक जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 07:31 PM2018-04-25T19:31:59+5:302018-04-25T19:31:59+5:30

गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल.

Announcing the General Director's Medal for the remarkable performance of five police officers of Beed | बीडच्या पाच पोलीसांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल महासंचालकांचे पदक जाहीर 

बीडच्या पाच पोलीसांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल महासंचालकांचे पदक जाहीर 

Next
ठळक मुद्दे२०१७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीडच्या पाच पोलिसांना हे पदक मिळाले आहे.

बीड : गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. यामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पदकांमुळे बीड जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून सर्वांच स्वागत केले जात आहे.

पोलीस दलात राहून विविध कर्तव्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पोलीस महासंचालकांकडून प्रत्येक वर्षी बोधचिन्ह, सन्माचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला जातो. २०१७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीडच्या पाच पोलिसांना हे पदक मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत असताना दरोडेखोर, कुख्यात गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिकाऱ्यांमध्ये पदक पटकावले. गेवराईचे घाडगे दाम्पत्य हत्या  प्रकरणाचा तपास लावण्यात आहेर यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच अट्टल दरोडेखोर शहाद्या भोसले याला पडत्या पावसात आष्टी तालुक्यात तीन किमी चिखल तुडवित पायी जावून बेड्या ठोकल्या होत्या. तसेच इतर गँगवरही त्यांनी अनेक कारवाया केल्या होत्या. याचीच दखल घेऊन आहेर यांना पदक दिले आहे. तसेच पोलीस हवालदार अभिमन्यू औताडे यांनी क्लिष्ट व थरारक अशा बहुचर्चित असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात भूमिका बजावली होती. पोह. परमेश्वर सानप, पोना मुकूंद तांदळे व बाबासाहेब करांडे यांनीही पोलीस दलात १५ वर्षे उत्तम सेवा केली आहे. 

या सर्वांना कामगार दिनाचे औचित्य साधून पोलीस मुख्यालयावर आयोजित केलेल्या संचलनानंतर पदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Web Title: Announcing the General Director's Medal for the remarkable performance of five police officers of Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.