कन्हेरवाडीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपी दादर येथून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:19 PM2023-08-14T17:19:07+5:302023-08-14T17:19:17+5:30

कॉन्ट्रॅक्टर बंडू मुंडे यांचा १ जुलै रोजी डोक्यात वार करून खून करण्यात आला होता.

Another accused in the Kanherwadi contractor's murder case is also under arrest | कन्हेरवाडीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपी दादर येथून अटकेत

कन्हेरवाडीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपी दादर येथून अटकेत

googlenewsNext

परळी: तालुक्यातील कन्हेरवाडी येथील कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू निवृती मुंडे यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपी महेश नामदेव रोडे (23, रा. कन्हेरवाडी) यास पकडण्यात परळी शहर पोलिसांना यश आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांनी 12 ऑगस्ट रोजी दादर येथे रोडे यास ताब्यात घेऊन 13 ऑगस्ट रोजी परळी ठाण्यात आणले.

एक जुलै रोजी परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील कॉन्ट्रॅक्टर बंडू मुंडे यांचा डोक्यात लोखंडी अँगलने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी बंडू मुंडे यांचा भाऊ शिवाजी मुंडे यांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात कन्हेरवाडीतील महेश नामदेव रोडे, पवन भीमराव रोडे या दोघा  विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर दोघे ही फरार झाले होते. आरोपीच्या अटकेसाठी कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांनी ६ जुलै रोजी परळी शहर बंद ठेवले होते. 

दरम्यान, परळी शहर पोलिसांचा तपास चालूच होता. रविवारी ( दि. 12) दादर, मुंबई येथे एपीआय सपकाळ यांनी तेथील पोलिसांच्या मदतीने महेश नामदेव रोडे या आरोपीस ताब्यात घेतले. 13 ऑगस्ट रोजी त्याला परळीत आणण्यात आले. आज त्यास परळी न्यायालयात हजर करण्यात आले. 

असा सापडला फरार आरोपी

आरोपी महेश नामदेव रोडेचे दादर परिसरामध्ये लोकेशन दिसून येत होते. परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ यांना रविवारी रात्री एन. सी. केळकर रोडवर हनुमान मंदिर जवळ आरोपी महेश नामदेव रोडे  चानक दिसून आला. तसेच तो तेथून निघून जाण्याच्या तयारीत होता. एपीआय सपकाळ हे सिव्हिल ड्रेसवर एकटेच असल्याने त्यांनी तात्काळ कबूतरखाना येथील दादर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार सुरेश भोसले तसेच हनुमान मंदिर सर्कल येथील वाहतूक पोलीस हवालदार बिन्नर यांना आरोपीस पकडण्यास मदत करण्याची विनंती केली. प्रसंगावधान राखून पोलीस हवालदार भोसले व बिन्नर यांनी पानेरी जंक्शन येथील पोलीस हवालदार सुधाकर पाटील यांना सुद्धा मदतीला बोलावून  महेश नामदेव रोडे यांस तात्काळ ताब्यात घेऊन परळीत आणण्यात आले. यावेळी गुन्ह्यात वापरलेली बंडू मुंडे यांची कार देखील पवन रोडे कडून पोलिसांनी जप्त केली.

एक आरोपी आधीच अटकेत

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणातच आरोपी पवन भीमराव रोडे यास 20 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील जळोली येथून पोलिसांनी अटक केली आहे. 7 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर पवन रोडेची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर अंबाजोगाई चे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले परळी शहर चे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर चे  सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ ,जमादार भास्कर केंद्रे ,गोविंद यलमटे ,गोविंद भताने यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Another accused in the Kanherwadi contractor's murder case is also under arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.