बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; ४४ एकर जमीन हडपली,१० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:33 PM2022-03-09T12:33:50+5:302022-03-09T12:36:01+5:30

Waqf Board land scam: ही जमीन विक्री करण्यासाठी बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून, वक्फ बोर्डाच्या औरंगाबादमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले.

Another Waqf Board land scam in Beed; 44 acres of land seized, crime against 10 persons | बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; ४४ एकर जमीन हडपली,१० जणांवर गुन्हा

बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; ४४ एकर जमीन हडपली,१० जणांवर गुन्हा

googlenewsNext

बीड : जिल्ह्यातील वक्फ बोर्डाची जमीन (Waqf Board land scam) बळकावल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा नाेंद झाला आहे. माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील ४४ एकर ८ गुंठे जमीन बळकावल्याप्रकरणी १० जणांविरोधात मंगळवारी दुपारी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

जिल्हा वक्फ अधिकारी अमीनुजमा खलीखुजमा सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नित्रूड येथे वक्फ बोर्डाच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ३६ व ३७ मध्ये ४४ एकर ८ गुंठे इनामी जमीन आहे. नित्रूड मशीदची नोंद महाराष्ट्र राजपत्रात अनुक्रमांक १ मधील १४ फेब्रुवारी, १९७४ अन्वये आहे, तसेच महसूल अभिलेखात खीदमत मास इनाम जमीन अशी नोंद आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्च, १९८२ रोजी ही जमीन हैदराबाद निर्मूलन कायद्यांतर्गत खालसा केलेली आहे. 

ही जमीन विक्री करण्यासाठी बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून, वक्फ बोर्डाच्या औरंगाबादमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संगनमत करून ही जमीन खालसा करत महसुली अभिलेखात फेरफार करून स्वत:च्या नावे करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही बाब समोर येताच, जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

अशी आहेत आरोपींची नावे
प्रदीप विश्वनाथ आगाव, बिभीषण रंगनाथ बोधवड, रंगनाथ बापुराव बोधवड, अभिमन्यू रंगनाथ बोधवड, अनुराधा विश्वनाथ निरडे, शीतल गणेश इरमले, स्नेहल अभिमन्यू बोधवड, सय्यद रज्जाक सय्यद जाफर, सय्यद रईस सय्यद जाफर, प्रशांत उत्तमराव तोष्णीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Another Waqf Board land scam in Beed; 44 acres of land seized, crime against 10 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.