शिरुर शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:41+5:302021-01-23T04:34:41+5:30
शिरुरकासार : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत प्लास्टिकमुक्त शहर आणि ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात गुरूवारी मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ...
शिरुरकासार : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत प्लास्टिकमुक्त शहर आणि ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात गुरूवारी मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फेरफटका मारला.
यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने व्यापाऱ्यांना करण्यात आले. अन्यथा प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला. दुकानाबाहेर कचरा टाकण्यासाठी बकेट ठेवून दुकान परिसरात कोठेही कचरा होऊ देवू नये तसे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याचेदेखील सांगण्यात आले. नागरिकांनी सामानाची खरेदी करण्यासाठी किंवा घराबाहेर पडताना कापडी पिशवी घेऊनच निघावे. घंटागाडी आल्यावर ओला आणि सुका कचरा वेगळा टाकण्याचे आवाहन देखील प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे. शहरात कोठेही विनापरवाना बॅनर,बोर्ड किंवा फ्लेक्स लावू नये तसे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहर सहभागी झाले असून शहराला जास्तीत जास्त सुंदर ठेवण्याचे आवाहन किशोर सानप यांनी केले आहे.
---
२८ किलो प्लास्टिक जप्त
या मोहिमेत जवळपास २८ किलो ५०० ग्राम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. मुख्याधिकारी किशोर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता राहुल देशमुख,वसुली लिपीक नामदेव घुगे,जगदीश तगर,अक्षय सूरवसे,कौसर शेख,शहादेव गायकवाड,शरद गवळी,प्रणांकुर दगडे,हनुमान कानडे यांनी ही कारवाई केली.