धारुर तालुक्यातील सहा गावांत होणार ॲंटिजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:37+5:302021-04-18T04:33:37+5:30
धारुर तालुक्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. तालुक्यातील अंजनडोह, खोडस, आवरगाव, कोळपिंपरी, आसरडोह, मोहखेड या ...
धारुर तालुक्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. तालुक्यातील अंजनडोह, खोडस, आवरगाव, कोळपिंपरी, आसरडोह, मोहखेड या गावांत मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून येत आहे. यामुळे तालुका आरोग्य प्रशासनाने या गावांसाठी गावातील ग्रामस्थांच्या कोविड-१९ ची तपासणी करण्याचे नियोजन केले. यासाठी तालुका आरोग्य कार्यालयाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला असून, विशेष ॲंटिजेन टेस्ट ड्राईव्ह घेण्यात येत आहे.
यासाठी भोगलवाडी व मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक नेमले आहे. भोगलवाडी केंद्राअंतर्गत अंजनडोह, खोडस, आवरगाव व कोळपिंपरी, तर मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आसरडोह व मोहखेड या गावात ड्राईव्ह राबवणार आहेत. शनिवारी ते मंगळवारपर्यंत दररोज एका गावात ही तपासणी मोहीम होणार आहे. पहिल्या दिवशी अंजनडोह येथे ॲंटिजेन मोहीम राबवण्यात येत असून दुपारपर्यंत १० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील गावे कोरोनामुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे या मोहिमेचे प्रमुख डॉ. अमोल दुबे यांनी सांगितले.