विनाकारण फिरणाऱ्या १६२ जणांची अँटिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:14+5:302021-04-28T04:36:14+5:30
सखाराम शिंदे गेवराई : शहरात मंगळवारी विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्याची मोहीम प्रशासनामार्फत राबविण्यात आली. एकूण ...
सखाराम शिंदे
गेवराई : शहरात मंगळवारी विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्याची मोहीम प्रशासनामार्फत राबविण्यात आली. एकूण १६२ जणांची चाचणी करण्यात आली असून तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. यात शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्याची मोहीम मंगळवारी सकाळी ८ ते १२ दरम्यान राबविण्यात आली. शहरातील मोंढा नाका व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चार तासांत जवळपास १६२ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात ३ जण पाॅझिटिव्ह निघाले. यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची वर्दळ एकदम कमी झाली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, तहसीलदार सचिन खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, मनीषा जोगदंड, मंडळ अधिकारी गजानन देशमुख, अंगद काशिद, पोलीस नारायण खटाने, गणेश नांगरे, तलाठी माणिक पांढरे, एकनाथ कावळे,भागवत येवलेसह पोलीस अधिकारी, महसूलचे कर्मचारी, होमगार्ड अनेक जण सहभागी होते.
७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
गेवराई शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली. ३६ जणांकडून ७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. या कारवाईमुळे शहरात आज दिवसभर सर्वच रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.
फोटो : गेवराई येथे मंगळवारी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासनाच्यावतीने अँटिजेन चाचणी करण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
===Photopath===
270421\20210427_103201_14.jpg~270421\20210427_102728_14.jpg